Loading...

सेकंड हँड कारचे स्वस्त मार्केट: 5 लाखांची कार मिळते फक्त 60 हजारात

भारतात मुंबई, अहमदाबाद, कोलकातासोबतच अनेक शहरात सेकंड हँड कार मार्केट आहेत.

Divya Marathi Sep 06, 2018, 12:06 IST

आल्टो डेस्क: भारतात मुंबई, अहमदाबाद, कोलकातासोबतच अनेक शहरात सेकंड हँड कार मार्केट आहेत. असेच एक मार्केट दिल्लीमध्येही आहे. करोल बाग येथील मार्केटमधून फक्त 60 हजारांमध्ये चांगल्या कंडीशनची कार खरेदी केली जाऊ शकते. येथे सेकंड हँड मारुती वैगनआर फक्त 60 हजारांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. शोरुममध्ये वैगनआरचे टॉप मॉडलची ऑनरोड प्राइज 5.45 लाख रुपये आहे. 

 

हे मार्केट कुठे आहे?
हे मार्केट करोलबाग येथील जल बोर्डजवळ आहे. येथे मारुतीपासून तर महिंद्रा, फोर्ड, हुंडई, वोक्सपॅगनसोबतच अनेक ब्रांडच्या कार उपलब्ध आहेत. या कारची कंडशीन चांगली असते. या कारवर कोणत्याच प्रकारचा डिफेक्ट नसतो आणि कार चकचकीत दिसतात. कारचे मॉडल जितके जुने असते, तेवढ्या कमी पैशात कार उपलब्ध होते. 

 

फायनन्सची सुविधा उपलब्ध 
सेंकड हँड कारच्या या मार्केटमध्ये आम्ही SSS Ji Car Bike & Properties च्या डीलरसोबत बातचित केली. त्यांनी सांगितले की, येथे सेकंड हँड कार 60 हजारांपासून मिळणे सुरु होते. या अमाउंटला फायनेन्सही केले जाऊ शकते. कारसोबत त्याचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही दिले जाते. म्हणजेच या कारमध्ये कोणत्याही प्रकारचे फ्रॉड होण्याची शक्यता नसते. कारच्या किंमतीत तुम्ही बारगेनिंगही करु शकता. 

 

या गोष्टींकडे ठेवा लक्ष 
तुम्ही या मार्केटमध्ये कार खरेदी करण्यासाठी जात असाल, तर तुम्हाला कारच्या सर्व पार्ट्सचे नॉलेज असणे महत्त्वाचे आहे. कारच्या इंजिनमध्ये काही खराबी असण्याची शक्यता असू शकते. यासोबतच एखादा पार्ट नकली असू शकतो. अशा वेळी तुम्ही एखादा कार एक्सपर्ट किंवा मॅकेनिकला सोबत घेऊन गेले तर फायद्याचे ठरेल. 

 

अशा आहेत सेकंड हँड कारच्या किंमती
मारुती वेगनआर : 60 हजार रुपये
टाटा नॅनो : 60 हजार रुपये 
हुंडई सेंट्रो : 60 हजार रुपये 
मारुती सुजुकी आल्टो : 1 लाख रुपये 
शेवरलेट बीट : 1.9 लाख रुपये 

 

नोट: बातमीत दाखवलेल्या किंमतींपेक्षा कारची किंमत कमी-जास्त असू शकते. जी किंमत दाखवली आहे, त्यावर तुम्ही बारगेनिंग करुनही कार खरेदी करु शकता. 

 


Loading...

Recommended


Loading...