सुरत- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरात सी-प्लेन सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर वर्षभरापासून रेंगाळलेल्या तापी गाळमुक्त करण्याच्या योजनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१६ पासून महापालिका व सिंचन विभाग यांच्या वादात अडकलेली गाळमुक्त करण्याच्या योजनेचे काम या आठवड्यापासून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात नदीच्या किनाऱ्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. यानंतर नदीतील रेती व मातीच्या ढिगाऱ्याचाही सर्व्हे करण्यात येईल. हे काम बडोद्यातील एका खासगी संस्थेकडून करवून घेतले जात आहे.
२००६ नंतर नदीच्या खोलीकरणाचे काम
महापालिका व सिंचन विभागाने गेल्या तीन वर्षांपासून तापी नदीत साचलेला गाळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु आजवर प्रगती थांबलेली आहे. २००६ मध्ये पूर आल्यानंतर नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू झाले. पण २०१८ पर्यंत नदीची स्वच्छताही झाली नाही व साचलेला गाळही निघालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतपासून सी-प्लेन सुरू करण्याची घोषणा केली आणि राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या.