Loading...

SC/ST कायदा विरोधात भारत बंदचा चार राज्यांत प्रभाव; मध्य प्रदेशात चांगला प्रतिसाद

मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात सुद्धा ठिक-ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे.

Divya Marathi Sep 07, 2018, 08:42 IST

भोपाळ/ नवी दिल्ली- अनुसूचित जाती-जमातीच्या कायद्यातील दुरुस्तीविरोधात गुरुवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला मध्य प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये बंदचा प्रभाव जाणवला. लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. उर्वरित राज्यांत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजप आमदार नरेंद्र कुशवाह यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली. 


बंद असलेल्या राज्यांतील बहुतांश खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुरक्षेचा उपाय म्हणून काही जिल्ह्यांत तर शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. ब्रह्म समागम सवर्ण जनकल्याण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र शर्मा म्हणाले, या बंदमध्ये सुमारे १५० हून अधिक सवर्ण व आेबीसी संघटना सहभागी झाल्या होत्या. विदिषा, सेहोल, देवास, इंदूर, ग्वाल्हेर, छत्तरपूर, मंदसौर, सागर, उज्जैन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. स्थानिक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

 


Loading...

Recommended


Loading...