Loading...

Bigg Boss 12 : सलमान खानला बिगबॉसच्या प्रत्येक एपिसोडसाठी मिळतेय 14 कोटी फीस

सलमान हा सर्वात जास्त कमाई करणारा बॉलिवूड स्टार आहे. बिग स्क्रिन आणि टेलिव्हीजन वर्ल्डमध्येही सलमान हायएस्ट पेड अॅक्टर आ

Divya Marathi Sep 11, 2018, 16:16 IST

मुंबई: सलमान हा सर्वात जास्त कमाई करणारा बॉलिवूड स्टार आहे. बिग स्क्रिन आणि टेलिव्हीजन वर्ल्डमध्येही सलमान हायएस्ट पेड अॅक्टर आहे. रिपोर्टनुसार बिग बॉसच्या मागच्या सीजनमध्ये सलमान 11 कोटी रु. प्रत्येक एपिसोडचे घेत होता. या सीजनसाठी सलमानला हाइक मिळाली आहे. परंतू त्याला जेवढे पाहिजे होते तेवढे मिळालेले नाही. शोसाठी सलमान आता 14 कोटी रु. प्रत्येक एपिसोडसाठी फीस घेणार आहे. परंतू हे सलमानने मागितलेल्या फीसनुसार नाही.


- हा शो 13 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालतो. सलमान प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार एपिसोडमध्ये दिसतो. यामुळे अंदाज लावला जातोय की, 'बिग बॉस' कडून तो जवळपास 364 कोटी रुपये फीस घेणार आहे.

 

सलमानने केली होती एवढी डिमांड 
सुत्रांनुसार, 'बिग बॉस'ची वाढती टीआरपी रेंडिगसोबत प्रत्येक वर्षी सलमानची फीस वाढत आहे. यावर्षी सलमानने प्रत्येक एपिसोडसाठी 19 कोटी रुपये मागितले होते. परंतू यावर्षी चॅनल जास्त पैसे लावण्यात इंट्रेस्टेड नाही. अशावेळी जास्त दिवस चालणा-या नेगोशिएशननंतर सलमान 14 कोटी प्रती एपिसोड फीससाठी तयार झाला आहे. होस्ट सलमान नवव्यांदा हा शो होस्ट करणार आहे. 
असे बोलले जात होते की, शोचे बजेट अपेक्षित केल्याप्रमाणे नाही. यामुळे फक्त होस्ट नाही तर कंटेस्टेंटलाही कमी पैसे मिळतील. शो लॉन्चिंग दरम्यान सलमानला त्याच्या फीसविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने प्रश्न टाळला होता. मेकर्स म्हणतात की, नोटबंदीमुळे पैसा कमी दिला जात आहे.

 

'बिग बॉस-12'मध्ये असतील 21 कंटेस्टेंट 
'बिग बॉस-12'मध्ये यावेळी 21 कंटेस्टंट असतील. यामध्ये 3 कॉमनर आणि 3 सेलिब्रेटी जोड्या असतील. तर 9 कंटेस्टेंट एकटेच सहभागी होतील. टीव्ही सेलेब्सविषयी बोलायचे झाले तर यावेळी टीव्ही कपल गुरमीत चौधरी-देबीना बनर्जी, पत्नी अंकिता कंवरसोबत बॉलिवूड अॅक्टर मिलिंद सोमन, टीव्ही अॅक्ट्रेस माहिका शर्मा आणि पोर्न स्टार डेनी--डी, टीव्हीचे प्रसिध्द कपल शोएब इब्राहिम-दीपिका कक्कड, टीव्ही शो गुलाम फेम परम सिंह, स्प्लिट्सविला विनर स्कारलेट मी रोज आणि सोशल मीडिया स्टार सुमेर एस परीछा म्हणजेच पम्मी आंटीला अप्रोच करण्यात आले आहे. या सर्वांची नाव कन्फर्म मानली जात आहेत.

 

या कॉमनर्सची नाव येत आहेत समोर 
रिपोर्ट्सनुसार नोएडा येथे राहणा-या रॉबिन गुर्जर आणि त्याच्या आजीला 'बिग बॉस'मध्ये कॉमनर म्हणून निवडण्यात आले आहे. रॉबिनने तो सिलेक्ट झाल्याचे इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले आहे. रॉबिनचे सिलेक्शन जूनच्या लास्ट वीकमध्ये झाले होते. रॉबिन चाइल्ड पॅरेंटच्या जोडीच्या कॅटेगिरीमध्ये आहे. रॉबिनने दिल्लीमधून शिक्षण घेतले आहे. 
- कॉमनर म्हणून उदित कपूर आणि सोमा मंगनानीचे नावही समोर आले आहे. उदित एक फिटनेस मॉडल आणि मॅकेनिकल इंजीनियर आहे. जर त्याने बिग बॉस शोमध्ये सिंगल एंट्री घेतली तर शोमध्येच त्याची जोडी बनवली जाईल. 
- उदितसोबतच 'बिग बॉस'मध्ये नवोदित अभिनेत्री सोमा मंगनानीही दिसणार आहे. विशेष म्हणजे ती येथे अॅक्टरसोबत दिसेल, अजून त्याचे नाव समोर आलेले नाही. 
 

 

 

 

 

 

 

 


Loading...

Recommended


Loading...