Loading...

सलमान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने 'स्त्री'मध्ये साकारली भूताची भूमिका, पहिले दिला होता नकार

राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर स्टारर 'स्त्री' चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत आहे.

Divya Marathi Sep 10, 2018, 10:25 IST

मुंबई: राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर स्टारर 'स्त्री' चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करत आहे. चित्रपटाने आतापर्यंत 64.78 कोटींची कमाई केली आहे. दूस-या वीकेंडपर्यंत हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल असा अंदाज वर्तवला जातोय. आता आम्ही तुम्हाला 'स्त्री' चित्रपटातील भूताच्या भूमिकेविषयी सांगत आहोत. फ्लोराने ही भूमिका साकारली. फ्लोरा ही ख-या आयुष्यात खुप ग्लॅमरस आहे आणि साउथची प्रसिध्द अभिनेत्री आहे. फ्लोराने 'स्त्री' चित्रपटाची ऑफर नाकारली होती. कारण तिला पहिले वेश्याची भूमिका ऑफर करण्यात आली होती. तिला सांगण्यात आले होते की, तिचे काम फक्त एक-दोन दिवसांचे आहे. फ्लोराला एक-दोन दिवसांचे काम करायचे नव्हते. परतू नंतर तिने चित्रपटातील डायलॉग ऐकले आणि ती चित्रपट करण्यास तयार झाली. तिने ऑडिशन दिली तेव्हा तिला भूताची भूमिका ऑफर झाली आणि ती 'स्त्री'मधील महत्त्वाचे पात्र बनली. ती स्क्रीनवर फक्त ओरडते.


साउथच्या या स्टार्ससोबत फ्लोराने शेअर केली आहे स्क्रीन 
- फ्लोराने आतापर्यंत जवळपास 50 पेक्षा जास्त साउथ चित्रपटांमध्ये सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.
- फ्लोराने साउथमध्ये रजनीकांतपासून तर विक्रम, रवी तेजा, वेंकटेश, बालकृष्ण आणि जगपती बाबूसारख्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. यावरुनच तिच्या प्रसिध्दीचा अंदाज येतो.
- जोपर्यंत 'स्त्री' चित्रपट रिलीज झाला नाही, तोपर्यंत सर्वांना वाटत होते की, चित्रपटात श्रध्दा कपूर भूताच्या भूमिकेत आहे. परंतू हा अंदाज खोटा ठरला.
- फ्लोराने 'स्त्री'पुर्वी सलमान खानच्या दबंग-2', 'धनक', 'लक्ष्मी', 'लव इन नेपाल' आणि 'बेगम जान' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

तासंतास हवेत लटकत राहिली होती फ्लोरा 
- चित्रपटांविषयी फ्लोरा सांगते की, "मेकर्सने मला सोशल मीडियावर टॅग केले नाही, कारण त्यांना लोकांना सत्यता कळू द्यायची नव्हती. परंतू आता जे रिअॅक्शन समोर येत आहेत, ते शानदार आहेत."
- फ्लोराने पुढे सांगितले की, "मी स्त्रीमध्ये एका भूताची भूमिका साकारली आहे, अनेक अभिनेत्रींना ही भूमिका साकारायची नसते. त्यांना स्क्रीनवर सुंदर दिसायचे असते. मी माझ्या करिअरमध्ये प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली आहे आणि हा चित्रपट चांगला बिझनेस करतोय याचा मला आनंद आहे. ही डार्क कॉमेडी आहे."
- "फक्त वीएफएक्समुळे माझे रुप भयानक दिसले नाही, तर मला यासाठी तासंतास हवेत लटकून राहावे लागले. चित्रपटाची अॅक्शन टीम एवढी शानदार होती की, मी हवेत लटकलेली असतानाही मला कॉफी उपलब्ध करुन देत होती. डायलॉगच्या नावावर माझ्या वाट्याला फक्त नावाने हाक देणे आणि ओरडणेच आले. मी खुप ओरडले."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फ्लोराचे फोटोज...
 


Loading...

Recommended


Loading...