Loading...

Bigg Boss 12 : इंट्रेस्टिंग आहेत या सिजनमधील कंटेस्टेंटच्या कहाण्या, घरात घालणार चांगलाच गोंधळ

\'बिग बॉस\' सीजन 12 चार दिवसांनंतर (16 सप्टेंबर) सुरु होणार आहे. शोमध्ये मोठे-मोठे सेलेब्स येणार आहेत,

Divya Marathi Sep 12, 2018, 13:36 IST

मुंबई: 'बिग बॉस' सीजन 12 चार दिवसांनंतर (16 सप्टेंबर) सुरु होणार आहे. शोमध्ये मोठे-मोठे सेलेब्स येणार आहेत, तर काही धमाकेदार कॉमनर जोड्याही सहभागी होणार आहेत. या सीजनची पहिली सेलिब्रिटी जोडी कंटेसंटेट भारती सिंह आणि हर्ष लिम्बचिया आहेत. तसेच पहिल्या चार कॉमनर कंटेस्टंटची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली आहे. चार कॉमनर कंटेस्टंट म्हणजेच दोन कॉमनर जोड्यांसाठी 'बिग बॉस'चे 2 ऑफिशियल प्रोमो जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये एक जोडी पोलिस आणि वकीलची आहे तर दुसरी जोडी फॅन आणि सेलिब्रिटीची आहे.


बिहारचा हा सिंगर घेतोय 'बिग बॉस'मध्ये एंट्री 
- यावेळी या शोमध्ये बिहारचा प्रसिध्द सिंगर दीपक ठाकुर एंट्री घेत आहे. विशेष म्हणजे तो या शोमध्ये फीमेल फॅनसोबत दिसणार आहे. 
- प्रोमोमध्ये फॅन आपल्याविषयी सांगत म्हणतात की, "आमची जोडी शोमध्ये सर्वात वेगळी असेल. शोमध्ये अनेक वेळा आई-मुलगा, पति-पत्नीच्या जोड्या आल्या आहेत, परंतू यावेळी शोमध्ये फॅन आणि सेलिब्रिटीची जोडी येईल."
- प्रोमोमध्ये फॅन मुलगी सांगते की, "मी सिंगर दीपक यांची खुप मोठी फॅन आहे, घरच्यांना न सांगताच मी त्यांना भेटण्यासाठी पळून आले होते." परंतू अजून फॅनचे नाव रिव्हिल केलेल नाही. 
- दीपक ठाकुरने 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि याच्या सीक्वलमध्ये आपला आवाज दिला आहे. यासोबतच त्याने अनुराग कश्यपच्या 'मुक्काबाज' चित्रपटात गाणे गायले आहे.

 

पोलिस-वकील असेल दूसरी जोडी
- प्रोमो पाहून तुम्हाला कळेल की, निर्मल सिंह एक पोलिस आहे. तो वाईटांसोबत वाईट आणि चांगल्यांसोबत चांगले करतो. यासोबतच त्याच्या नाकावर नेहमीच राग असतो.
- तर निर्मलचा जोडीदार रोमिल चौधरीविषयी बोलायचे झाले तर तो पेश्याने वकील आहे. निर्मल रोमितविषयी सांगताना म्हणतो की, रोमित एक खुपच बदमाश व्यक्ती आहे. तो जज समोर बोलताना अशा प्रकारे बोलतो, जसा त्याच्या स्वतःसोबतच क्राइम झाला आहे. 
- यासोबतच दोघंही बॅक्राउंडमध्ये बोलताना दिसत आहेत की, 'बिग बॉस'च्या घरात जेव्हा पोलिस आणि वकीलची जोडी एंट्री घेतील, तेव्हा इतर लोकांचे काहीच खरे नाही. इंडियाला खुप मजा येईल.
- प्रोमो पाहून अंदाज येतोय की, निर्मल आणि रोमित येणा-या दिवसात बिग बॉसमध्ये चांगला हंगामा करतील. 

 

 


Loading...

Recommended


Loading...