Loading...

काही सेकंदावर होता महिलेचा मृत्यू, देवदूत बनून आला कॉन्सटेबल आणि वाचवला प्राण, मुंबईतील घटना

महिला पडली त्याचवेळी ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी तत्परता दाखवत महिलेला लगेचच प्लॅटफॉर्मकडे ओ

Divya Marathi Sep 12, 2018, 21:08 IST

मुंबई - चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका महिलेच्या जीवालाच धोका निर्माण झाला. पण एका कॉन्सटेबलच्या चपळतेमुले तिचा जीव बालंबाल बचावला. हा आरपीएफ कॉन्सटेबल तिच्या जवळून जात होता म्हणूनच तिचा जीव वाचला. 


ही घटना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बुधवारी मंगळवारी घडली आहे. महिला गुजरात मेल रेल्वेने सूरतला जात होती. तिच्या  कुटुंबातील इतर लोक रेल्वेमध्ये चढले होते. ही महिला चढत होती. पण रेल्वे सुरू असल्याने तिचा पाय सरकला आणि ती पडली. महिला पडली त्याचवेळी ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी तत्परता दाखवत महिलेला लगेचच प्लॅटफॉर्मकडे ओढले. काही सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी ती महिला रेल्वेखाली आली असती. 

 

पुढे पाहा व्हिडिओ..

 


Loading...

Recommended


Loading...