Loading...

रोहितकडे कर्णधारपद, काेहलीला विश्रांती; आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

येत्या १५ सप्टेंबरपासून अाशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत युवा कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्

Divya Marathi Sep 02, 2018, 10:53 IST

मुंबई - येत्या १५ सप्टेंबरपासून अाशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत युवा कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अापले काैशल्य पणास लावणार अाहे. नियमित कर्णधार विराट काेहलीला विश्रांती देण्यात अाली. अाता त्याच्या जागी राेहितकडे नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीअाय) निवड समितीने शनिवारी या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घाेषणा केली.    


सातत्याच्या सामन्यातील सहभागानंतर अाता काेहलीने विश्रांतीचा निर्णय घेतला. त्यामुळे  त्याला या मालिकेत विश्रांती देण्यात आली.  सलामीवीर शिखर धवन संघाचा उपकर्णधार असणार आहे. अंबाती रायडू, केदार जाधव, मनीष पांडे यांनी संघात पुनरागमन केले आहे.  

 
मुंबईला बीसीसीआयच्या मुख्यालयात निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली.  ही स्पर्धा यूएईमध्ये १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात होणार आहे.  या स्पर्धेसाठी टीम इंडिया अ गटात समावेश करण्यात अाला. याच गटात भारतासह पाकिस्तान टीमही सहभागी अाहे.   तिसरा संघ हा पात्रता फेरीतीन निकालानंतर ठरेल.  


१९ सप्टेंबरला भारत-पाक झुंजणार :  अाशिया कपमध्ये १९ सप्टेंबर, बुधवारी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत अाणि पाकिस्तान यांच्यात झुंज रंगणार अाहे. हे दाेन्ही संघ गटातील सामन्यात समाेरासमाेर असतील.

 

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धाेनी, दिनेश कार्तिक, हार्दिक, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल

 


Loading...

Recommended


Loading...