Loading...

प्रेयसीच्या घरापर्यंत बोगदा बनवताना पकडे गेले होते ऋषी कपूर यांचे पणजोबा, घोडीची तुलना केली होती गो-या मेमसोबत

पृथ्वीराज कपूर यांचे वडील आणि ऋषी कपूर यांचे पणजोबा बाशेश्वरनाथ तहसीलदार होते.

Divya Marathi Sep 04, 2018, 13:30 IST


मुंबईः बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा आज (4 सप्टेंबर) वाढदिवस असून ते 66 वर्षांचे झाले आहे. त्यांच्या घराण्याविषयी सांगायचे झाल्यास, कपूर घराण्याचा इतिहास 100 वर्षांहून अधिकचा आहे. ऋषी यांचे पणजोबा बाशेश्वरनाथ, आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते वडील राज कपूरपर्यंत, कपूर घराण्यातील प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक खास ओळख आहे. ऋषी कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची बायोग्राफी 'खुल्लम खुल्ला'मध्ये उल्लेख 

करण्यात आलेला एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

 

जेव्हा ऋषी कपूर यांच्या पणजोबांनी प्रेयसीच्या घरापर्यंत बनवला होता बोगदा... 

- दीवान बाशेश्वरनाथ कपूर यांचे नाव कपूर फॅमिली ट्रीमध्ये सर्वप्रथम येतं. पृथ्वीराज कपूर यांचे वडील आणि ऋषी कपूर यांचे पणजोबा बाशेश्वरनाथ तहसीलदार होते. ते लोकांमध्ये दीवान साहेब या नावाने प्रसिद्ध होते.  

- वयाच्या 36 व्या वर्षी त्यांना नोकरीतून सस्पेंड करण्यात आले होते. याचे कारण त्यांची कामातील चूक नव्हती, तर ते प्रेमात पडले होते. 
- ते एका तरुणीवर जीवापाड प्रेम करत होते. ते त्या तरुणीच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते, की प्रेयसीच्या घरापर्यंत बोगदा बनवत असताना ते पकडले गेले होते. याच कारणामुळे त्यांना नोकरीतून सस्पेंड करण्यात आले होते.

 

राज कपूर यांना मिळाला होता आईचा पाठिंबा...
- कपूर घराण्यातील अनेकांचे डोळे नीळे आहेत. ऋषी कपूर यांच्या आजीचे डोळेदेखील नीळेभोर होते. पृथ्वीराज कपूर यांच्या पत्नी रामसरनी कपूर अतिशय देखण्या होत्या.

- रामसरनी त्याकाळातील सर्वात सुंदर महिला होत्या. त्यांना बघणारे बघतच राहायचे. 
- राज कपूर यांनी सिनेसृष्टीत जे यश मिळवले, त्याचे श्रेय रामसरनी कपूर अर्थात त्यांच्या आईला जाते. 


गो-या घोडीची तुलना केली होती गो-या मेमसोबत...
- बाशेश्वरनाथ यांचा आणखी एक रंजक किस्सा आहे. एकदा ब्रिटिश अधिका-यासोबत ते समोरासमोर आले होते.
- ब्रिटिश अधिका-याने त्यांच्या घोडीचे कौतुक करताना, "तुझी घोडी खूप सुंदर आहे," असे म्हटले होते. याचे उत्तर त्यांनी अतिशय गमतीशीररित्या दिले होते. ते म्हणाले होते, "तुझ्या गोरीपेक्षा खूप छान आहे." त्यांचा इशारा ब्रिटिश अधिका-यासोबत तेथे आलेल्या गो-या मेमकडे होता. 

 

पहिले पृथ्वीनाथ होते पृथ्वीराज यांचे नाव
- कपूर घराण्यातील व्यक्तींच्या नावापुढे पुर्वी नाथ लिहिले जायचे. पण बाशेश्वरनाथ यांनी ते बदलून राज केले. त्यानंतर पृथ्वीनाथ कपूर, पृथ्वीराज कपूर बनले.
- राज कपूर यांचे जन्मनाव श्रृष्टीनाथ कपूर ठेवण्यात आले होते. नंतर ते रणबीर राज कपूर असे करण्यात आले. पण जेव्हा ते सिनेसृष्टीत आले, तेव्हा ते राज कपूर या नावानेच ओळखले जाऊ लागले. 


Loading...

Recommended


Loading...