Loading...

मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय अनिल कपूर यांची धाकटी मुलगी, 8 वर्षांपासून करतेय डेट

अनिल कपूर यांची धाकटी कन्या रिया कपूर तिचा बॉयफ्रेंड करण भूलानीसोबत सध्या मालदीवमध्ये सुटीचा आनंद लुटतेय.

Divya Marathi Aug 07, 2018, 16:44 IST

मुंबईः अभिनेते अनिल कपूर सध्या बर्लिनमध्ये पत्नी सुनीतासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. तर दुसरीकडे त्यांची थोरली कन्या सोनम आणि जावई आनंद यूएसमध्ये क्वॉलिटी टाइम स्पेंड करत आहेत. इतकेच नाही तर त्यांची धाकटी कन्या रिया कपूर हीदेखील तिचा बॉयफ्रेंड करण भूलानीसोबत सध्या मालदीवमध्ये सुटीचा आनंद लुटतेय. स्वतः करणने रियासोबतचे हॉलिडे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये हे कपल मस्तीच्या मूडमध्ये दिसतंय. रिया तिच्या लव्ह लाइफविषयी अतिशय ओपन आहे. तिने करणची भेट कपूर कुटुंबीयांसोबत घालून दिली असून हे दोघे कायम पार्टी, इव्हेंट्समध्ये एकत्र दिसत असतात. इतकेच नाही तर सोनमच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये करण हजर होता.

 

कोण आहे करण भूलानी...
- रियाचा बॉयफ्रेंड करण टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत कॅमे-यामागे काम करतो. त्याने अनेक फिल्म्स आणि शोजसाठी दिग्दर्शन, प्रॉडक्शन आणि डबिंगचे काम केले आहे.
- 2010 मध्ये आलेल्या 'आएशा'  या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत असताना रिया आणि करण यांचे अफेअर सुरु झाले होते. 2013 मध्ये दोघे लग्नही करणार होते. करणचे आईवडील कपूर फॅमिलीला भेटायला दिल्लीहून मुंबईत आले होते. डिसेंबर 2013 मध्ये लग्नाची तारीख निश्चित झाल्याचेही म्हटले गेले होते. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न झाले नाही.
- अनिल कपूरच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कपूर कुटुंब लंडनला गेले होते. तेथे आनंद आहुजासोबत रियाचा बॉयफ्रेंड करणदेखील हजर होता.

 

फॅशन डिझायनरसोबतच प्रोड्युसर आहे रिया कपूर...

- रिया एक फॅशन डिझायन असून थोरली बहीण सोनम कपूरचे ड्रेसेस तीच डिझाइन करत असते. तिचा स्वतःचा फॅशन ब्रॅण्डदेखील आहे.
- रियाने निर्माती म्हणून  'आएशा'(2010) चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. पण तिचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.  'आएशा'नंतर रियाने सोनम कपूरसोबत 'खूबसूरत'(2014) आणि 'वीरे दि वेडिंग'(2018) हे दोन चित्रपट बनवले. 

 


Loading...

Recommended


Loading...