Loading...

5 वर्षांपासून भटकत होती ही मेंढी, परतली तेव्हा आकार पाहून हैराण झाली Rescue Team

तिचे वजन इतके वाढले होते, की तिला चालताही येत नव्हते.

Divya Marathi Sep 12, 2018, 00:10 IST

कॅनबेरा - ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वीच एका संस्थेने बचाव मोहिम राबवत असताना एका मेंढीचा जीव वाचवला. त्या मेंढीचा आकार पाहूनच स्वयंसेवी हैराण झाले होते. तिचे वजन इतके वाढले होते, की तिला चालताही येत नव्हते. शरीरावरचे लोकर इतके वाढले होते की तिचा जीव धोक्यात सापडला होता. लोकर काढल्यानंतर ही मेंढी जगभरात लोकप्रीय झाली. तिच्या शरीरावरून तब्बल 40 किलो लोकर निघाले असून ते एक जागतिक विक्रम आहे. 
 

ऑस्ट्रेलियातील प्राणी संरक्षण संस्थेने सप्टेंबर 2015 मध्ये राबवलेल्या मोहिमेत या मेंढीचा जीव वाचवला होता. त्यावेळी त्यांनी हिचे नाव ख्रिस ठेवले होते. तिची अवस्था अतिशय गंभीर होती. गेल्या 5 वर्षांपासून ही मेंढी बेपत्ता होती. सरासरी दरवर्षी मेंढ्यांचे लोकर काढले जाते. परंतु, इतकी वर्षे तिच्या शरीरावरील लोकर काढण्यात आलेच नाही. भटकंती करताना तिचे वजन इतके वाढले होते की थोडासाही विलंब तिचा जीव घेणारा ठरला असता. कॅनबेरातील प्राणी तज्ञांनी एक्सपर्ट इयान एल्किन्सला बोलावून मेंढीवरील लोकर काढली. त्यापूर्वी एका मेंढीच्या शरीरावरून सर्वाधिक लोकर काढण्याचा विक्रम 27 किलो होता. परंतु, ख्रिसच्या शरीरावरून जवळपास दुप्पट 40 किलो लोकर काढण्यात आले.


Loading...

Recommended


Loading...