Loading...

चाकूच्या धाकावर पळवून नेत महिलेवर अत्याचार; अमरावतीतील खळबळजनक घटना

चाकूच्या धाकावर पळवून नेत महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. अमरावतीहून पुणे नेल्यानंतर शेगावात बलात्कार केल्य

Divya Marathi Sep 05, 2018, 12:24 IST

अमरावती- चाकूच्या धाकावर पळवून नेत महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. अमरावतीहून पुणे नेल्यानंतर शेगावात बलात्कार केल्याच्या महिलेल्या तक्रारीनंतर बडनेरा पोलिस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बडनेरा नवीवस्ती जयस्तंभ चौकातील रहिवासी चेतन दिलीप सदांशिवे (वय २७), दिलीप सदांशिवे (४६) आणि अज्ञात चार चालक यांच्या विरोधात पळवून नेत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचित असलेल्या चेतन याने महिलेच्या मुलाला चाकू लावून ऑटोत बसवित अमरावती येथील बसस्थानकात आणले. मुलासोबत महिलेला देखील अमरावती बसस्थानक येथे घेऊन गेला. त्यानंतर दिलीप सदांशिवे याने पांढऱ्या रंगाची कार आणून महिला व तिच्या मुलास पुणे येथे घेऊन गेले. पुणे येथे दिवसभर फिरल्यानंतर दिलीप हा कार तसेच चालकासोबत परत निघुन आले. मात्र, चेतन याने मुलाला व महिलेला रेल्वेने शेगाव येथे आणले. शेगाव येथे दोन दिवस राहिल्यानंतर रेल्वे स्थानकावर अंधाराचा फायदा घेत चेतनने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 


Loading...

Recommended


Loading...