Loading...

पुतण्यावर प्रेम करत होती आत्या, म्हणाली पळवून घेऊन जा नाहीतर मारून टाक, दुसरे ऑप्शन निवडले पुतण्याने

18 वर्षीय पूजा मेघवालचे शव संशयास्पद अवस्थेत घराच्या मागे असलेला शेतातील झाडाला लटकवलेले आढळून आले.

Divya Marathi Sep 12, 2018, 14:11 IST

चिडावा (राजस्थान) 18 वर्षीय पूजा मेघवालचे शव संशयास्पद अवस्थेत घराच्या मागे असलेला शेतातील झाडाला लटकवलेले आढळून आले. हात पाठीमागे ओढणीने बांधलेले होते आणि गळ्यावर दोरखंडाचे, छाती आणि उजव्या कानाजवळ जखमेच्या खुणा होत्या. चिडावा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पोस्टमोर्टम करण्यात आले. वडील होशियार सिंह यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही तासांच्या आताच आरोपीला अटक केली. मृत पूजा आरोपीची नात्याने आत्या होती. आरोपीने गळा दाबुन खून केल्याची कबुली दिली आहे.

 
पूजाने लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे केला खून 
चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, पूजा लग्नासाठी दबाव टाकत होती. यामुळे तिचा खून करावा लागला. पूजाच्या वडिलांनी सांगितले की, सकाळी पाच वाजता टॉयलेटची उठलो तेव्हा पूजा झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर घरातील सदस्यांना उठवले आणि शव खाली उतरवले. माजी सरपंच उम्मेद सिंह यांना कळवले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. 


आरोपी मध्यरात्रीनंतर आला पूजाचा घरात
आरोपी नितेशने पोलिसांना पूजासोबत आपले मागील 7-8 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. पूजा लग्नासाठी पळवून घेऊन जाण्याचा दबाव टाकत होती. सोमवारी रात्री 11 वाजता नितेश पूजाला भेटण्यासाठी घराच्या मागे गेल्यानंतर त्या दोघांना पूजाच्या वहिणीने पाहिले. त्यामुळे नितेश थेतून निघून आला. पुन्हा रात्री दीड-दोन वाजता घराच्या मागे पोहोचला. तेथे पूजासोबत बसून दारू पिली. पूजाने त्याला पळवून घेऊन जा नाहीतर मारून टाक असे म्हटले.


कुटुंबियांना झोपेच्या गोळ्या खाऊ घालून नितेशला भेटत होती पूजा
नितेशला भेटण्यासाठी पूजा आपल्या घरातील सदस्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकत होती. नितेशने पोलिसांना सांगितले की, पूजा झोपेच्या गोळ्या सुलतानच्या मेडिकल स्टोअरमधून घेत होती. हे दीड वर्षांपासून चालू होते.


Loading...

Recommended


Loading...