Loading...

Asian Games:राही सरनोबतने नेमबाजीत पटकावले सुवर्ण, हॉकीमध्ये भारताचा विक्रमी विजय

आशियाई स्पर्धांमधील राहीचे हे दुसरे पदक आहे. राहीने 2014 इंचियोन एशियाडमध्येही याच प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती

Divya Marathi Aug 22, 2018, 15:29 IST

- या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा निर्णय शूट आऊटद्वारे झाला. 

- शूट आउटमध्ये राहीने 3 आणि यांगपेबूनने 2 टार्गेटवर निशाणा साधला. 

 
पालेमबंग - मराठमोळी नेमबाज राही सरनोबत हिने 18व्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला चौथ्या सुवर्ण पदकाची कमाई करून दिली आहे. राहीने बुधवारी झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात 34 अंकांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धांमधील राहीचे हे दुसरे पदक आहे. राहीने 2014 इंचियोन एशियाडमध्येही याच प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. राहीने या पदकांची कमाई करत आशियाई स्पर्धेतील विक्रमही रचला आहे. 


या एशियाड स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात रौप्य पदताची मानकरी ठरली थायलंडची नपास्वान यांगपेबून. यांगपेबून हिनेही 34 अंक मिळवले. पण शूटआऊटमध्ये ती 5 पैकी फक्त 2 टारगेट वर निशाणा लावू शकली. 29 अंकांच्या स्कोरसह कोरियाच्या किम मिनजुंगने कांस्य पदक मिळवले. 

 

हॉकीत विक्रमी विजय 
दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने बुधवारी आजवरचा सर्वात मोठी विजय नोंदवला. भारताने 86 वर्षे जुना विक्रम मोडीत काढली. भारतीय पुरुषांच्या संघाने हाँगकाँगचा 26-0 ने पराभव केला. यापूर्वी भारताने 1932 ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा 24-1 ने पराभव केला होता. भारताच्या रुपिंदर पाल सिंग, हरमनप्रित सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी 4-4 गोल केले. तर आकाशदीप सिंहने 3 आणि वरुण कुमार-मनप्रित सिंग यांनी 2-2 तर सुनील आणि विवेक सागरने 1-1 गोल केले. 

 


Loading...

Recommended


Loading...