Loading...

Forbes सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला अॅथलिटच्या यादीत सिंधू 7 व्या स्थानी, सेरेना पहिल्या क्रमांकावर

फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार सिंधूची वर्षाची कमाई 85 लाख US डॉलर एवढी आहे. या यादीमध्ये टेनिसपटुंचे वर्चस्व आहे.

Divya Marathi Aug 22, 2018, 13:24 IST
स्पोर्ट्स डेस्क - जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला अॅथलिट्सच्या यादीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने TOP 10 मध्ये स्थान मिळवले आहे. फोर्ब्सने मंगळवारी जाहीर केलेल्या वार्षिक यादीमध्ये सिंधूने हे स्थान मिळवले. तर या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे, जागतिक स्तरावरील अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स.    फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार सिंधूची वर्षाची कमाई 85 लाख अमेरिकन डॉलर एवढी आहे. या यादीमध्ये प्रामुख्याने टेनिसपटुंचे वर्चस्व राहिलेले आहे. त्या सिंधूशिवाय आणखी फक्त केवळ एक अशी खेळाडू आहे जी टेनिसमधील नाही. ती म्हणजे रेसिंग कार ड्रायव्हर डॅनिका पॅट्रीक. ती या यादीत नवव्या स्थानी आहे.    सेरेना सलग तिसऱ्या वर्षी अव्वल सेरेनाने सलग तिसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. सेरेनाने गेल्या वर्षात 62 हजार अमेरिकन डॉलर स्पर्धांमधून कमावले. पण जाहिरातींच्या माध्यमातून तिने जवळपास 1 कोटी 81 लाख अमेरिक डॉलरची कमाई केली असल्याचे फोर्ब्सच्या यादीत म्हटले आहे.    रियो ऑलिम्पकपासून सिंधूची चर्चा  2016 साली झालेल्या रियो ऑलिम्पिकनंतर सिंधूचा यशाचा आलेख सतत चढता राहिलेला आहे. 2016 च्या ऑलिम्पक स्पर्धेत सिंधूने रौप्य पदकाची कमाई करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तेव्हापासून भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा म्हणून सिंधू ओळखली जात आहे.   

 


Loading...

Recommended


Loading...