Loading...

'समांतर' प्रस्ताव अखेर राज्य शासनाकडे रवाना

४ सप्टेंबरला मनपा सभेने समांतर जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याच कंपनीसोबत करार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला. तो

Divya Marathi Sep 11, 2018, 09:39 IST

औरंगाबाद- ४ सप्टेंबरला मनपा सभेने समांतर जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याच कंपनीसोबत करार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला. तो सोमवारी (१० सप्टेंबर) राज्य शासनाकडे रवाना झाला आहे. तेथे आता कंपनीसोबत करावयाच्या कराराचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. त्यानंतर तो मसुदा पुन्हा मान्यतेसाठी मनपाकडे येईल आणि त्यावर सहमती झाल्यानंतर ठेकेदार कंपनीशी नव्याने करार होईल. मगच समांतर प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल. 


प्रशासनाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रस्ताव सभेसमोर पाठवला होता. ४ सप्टेंबरपर्यंत सहा वेळा ही सभा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांनी तहकूब झाली होती. मात्र अखेर ४ सप्टेंबरला प्रस्ताव मंजूर करून ५ सप्टेंबरला महापौर नंदकुमार घोडेले यांनी तो आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे पाठवला होता. 


Loading...

Recommended


Loading...