Loading...

हैदराबादहून शिर्डीत आलेल्या विमानात बिघाड, उड्डाण रद्द

हैदराबादहून प्रवासी घेऊन शिर्डीत अालेल्या विमानात रविवारी अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दुपारी ४ वाजता हैदराबादकडे

Divya Marathi Sep 10, 2018, 08:46 IST

शिर्डी- हैदराबादहून प्रवासी घेऊन शिर्डीत अालेल्या विमानात रविवारी अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दुपारी ४ वाजता हैदराबादकडे परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात अाले. या विमानाने परतीच्या प्रवासात जाणाऱ्या सुमारे ५० प्रवाशांना प्रवास भाडे कंपनीच्या वतीने परत करण्यात अाले तसेच शिर्डीत त्यांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात अाली. दरम्यान,  रात्री मुंबईहून एअर अलाइन्स विमान कंपनीचे टेक्निशियन दाखल झाले हाेेत.  त्यांनी अहवाल दिल्यानंतर साेमवारी हे विमान हैदराबादकडे प्रयाण करेल.   


शिर्डी विमानतळावरून हैदराबादला दरराेज विमान सेवा सुरू अाहे. त्यास  साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारी दुपारी हैदराबादकडून हे विमान प्रवासी घेऊन विमानतळावर येऊन उतरले.  धावपट्टीवर जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विमान बंद पडले. त्यानंतर काही वेळाने चालू झाले आणि विमान सुरक्षित पार्किंगमध्ये आणण्यात आले. मात्र टेक्निशियनचा अहवाल आल्यावर उड्डाण करण्याचा निर्णय घेण्यात अाला.


Loading...

Recommended


Loading...