Loading...

प्रियांका आणि निकचे हे Royal फोटोशूट पाहिले का तुम्ही! या फोटोशूटची तर कॉपी नाही ना...

प्रियांका आणि निकने केलेले हे फोटोशूट प्रियांकाची मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांच्या फोटोशूटसारखेच आहे.

Divya Marathi Sep 10, 2018, 19:19 IST

एंटरटेन्मेंट डेस्क- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ‘Ralph Lauren’ या फॅशन ब्रँडचे सदिच्छा दूत असलेल्या प्रियांका- निकने अलीकडेच न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये उपस्थिती लावली होती. निक आणि प्रियांकाच्या या जोडीने फॅशन वीकमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या फॅशन वीकनंतर प्रियांका आणि निकचं फोटोशूटदेखील पार पडले.

 

पण प्रियांका आणि निकने केलेले हे फोटोशूट प्रियांकाची खास मैत्रीण ‘डचेच ऑफ ससेक्स’ म्हणजेच मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांच्या फोटोशूटसारखेच आहे. त्यामुळे हे फोटोशूट चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे ज्या फोटोग्राफरने मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही लग्नातील फोटो काढले त्याच फोटोग्राफरकडून प्रियांका आणि निकने फोटो काढून घेतले आहे. मेगन ही प्रियांकाच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. मेगनने प्रियांकाला तिच्या रॉयल वेडिंगचे आमंत्रणही दिले होते. प्रियांका या लग्नाला आवर्जुन हजर होती.


Loading...

Recommended


Loading...