Loading...

Builder ने पाडले 150 वर्षे जुने बांधकाम; भिंतीखाली सापडले गुप्तधन आणि खजिन्याचा मार्ग...

थिएटरखाली सापडलेल्या नाणी रोमन साम्राज्याच्या आहेत. त्याची किंमत किती असेल याचा अंदाज लावणे सुद्धा कठिण आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 00:03 IST

कोमो - इटलीत एका जुन्या नाट्यगृहाची इमारत पाडताना प्रशासनाला मोठे यश आले आहे. कोमो शहरात गेल्या बुधवारी (5 सप्टेंबर) बिल्डर 150 वर्षे जुनी इमारत पाडत होते. त्याचवेळी त्यांना शेकडो वर्षांपूर्वी दडलेल्या खजिना सापडला. या इमारतीच्या भिंतींखाली एक भांडे सापडले जे सोन्याच्या नाणींनी भरले आहे. ह्या नाणी 500 वर्षांपूर्वीच्या रोमन साम्राज्यातून असल्याचे सांगितले जात आहे. तज्ञांनी या ठिकाणी आणखी खजिना सापडणार असे भाकित वर्तवले आहे. त्यामुळे, परिसरात गर्दी वाढल्याने चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


खजिन्याची किंमत लावणे आव्हान...
इटलीतील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, थिएटरखाली सापडलेल्या नाणी रोमन साम्राज्याच्या आहेत. त्याची किंमत किती असेल याचा अंदाज लावणे सुद्धा कठिण आहे. आर्कियोलॉजिस्ट लूसा रिनाल्डी यांनी सांगितले, की "आम्ही या खजिन्याची किंमत लावू शकत नाही. कारण, अशा खजिन्याची विक्री बाजारात शक्य नाही. ते देश आणि येथील जनतेसाठी अमूल्य आहे. वस्तू जेवढ्या पुरातन असतील त्याच्या संरक्षणाचे महत्व तितकेच अधिक असते." ज्या नाट्यगृहाची इमारत पाडण्याचे काम सुरू होते त्याची स्थापना 1870 मध्ये झाली होती. कालांतराने त्याचे सिनेमागृहात रुपांतर झाले. परंतु, 1997 मध्ये ते सुद्धा बंद पडले. 


भांड्याने दाखवला गुप्त धनाचा मार्ग...
सांस्कृतिक मंत्री अॅलबर्टो बोनिसोलींनी सांगितले, की कोमो येथे सापडलेल्या खजिन्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व काय याचा अभ्यास केला जात आहे. तेथे सापडलेल्या भांड्यानेच पुरातत्वदेतांना एक नवीन मार्ग सापडला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारने तूर्तास तेथील काम थांबवले असून आता खजिन्याचा शोध घेतला जात आहे.


Loading...

Recommended


Loading...