Loading...

पंपावर कर्मचाऱ्याने पेट्रोलऐवजी गाड्यांत भरले पाणी, थोड्याच अंतरावर बंद पडल्या सर्व गाड्या, समोर आले हे कारण

एक दोन नव्हे 100-125 लोकांनी अशी तक्रार केली. सर्व पंपावर आले आणि गोंधळ सुरू झाला.

Divya Marathi Sep 13, 2018, 00:00 IST

नवी दिल्ली - येथील एका पंपावर अनेक गाड्यांमध्ये पेट्रोलऐवजी पाणी भरण्यात आले. निजामुद्दीन वेस्टच्या एचपी पंपावरील हा प्रकार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार येथे लोकांनी पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावर जाताच त्यांच्या गाड्या बंद पडल्या. गाडी ढकलत मॅकेनिककडे गेल्यानंतर पेट्रोलऐवजी गाडीत पाणी बरल्याचे लक्षात आले. एक दोन नव्हे 100-125 लोकांनी अशी तक्रार केली. सर्व पंपावर आले आणि गोंधळ सुरू झाला. 


काही वेळासाठी बंद झाला पंप 
रागावलेल्या लोकांनी पीसीआर कॉल केला पण पोलिस जवळपास 30 मिनिट उशिरा पोहोचले. तोपर्यंत पंपाच्या जवळच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पण पोलिसांनी ही कोंडी सोडवली. पोलिसांनी लोकांची तक्रार ऐकली आणि गोंधळ कमी करण्यासाठी पंप 2 तासांसाठी बंद केला. तपास केल्यानंतर 2 लीटरच्या बाटलीत फक्त 250 मिली पेट्रोल निघाले. 


का भरले पाणी?  
पोलिसांनी याबाबत मॅनेजरबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी पाणी भरले नाही. मागच्या बाजुने टाकीत पाणी आले असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पोलिसांत अद्याप लेखी तक्रार झालेली नाही. एचपीचटी टेक्निकल कमिटी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. 


Loading...

Recommended


Loading...