Loading...

परभणीत पेट्रोलने नव्वदी ओलांडली, मुंबई-दिल्लीमध्ये 14 पैशांची वाढ, सलग सहाव्या दिवशी भडका

मुंबईत पेट्रोल 88.26 रुपये आणि दिल्लीमध्ये 80.87 रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही शहरांमध्ये 14 पैशांनी दरवाढ झाली आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 16:50 IST

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या परभणीमध्ये पेट्रोल मंगळवारी 33 पैशांनी महागल्याने पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे. परभणीत पेट्रोल आज 90.33 रुपये लीटर असेल. देशभरातील पेट्रोलचा हा सर्वाधिक दर आहे. मुंबईत पेट्रोल 88.26 रुपये आणि दिल्लीमध्ये 80.87 रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही शहरांमध्ये 14 पैशांनी दरवाढ झाली आहे. मुंबईत डिझेल 15 पैशांनी महागून 77.47 आणि दिल्ली 72.97 रुपयांवर पोहोचले आहे. 

 

मेट्रो शहरांतील पेट्रोलचे दर 

शहर सोमवारचे दर (रुपये/लीटर) मंगळवारचे दर (रुपये/लीटर) वाढ
दिल्ली 80.73 80.87 14 पैसे
मुंबई 88.12 88.26 14 पैसे

मेट्रो शहरांतील डिझेलचे दर
शहर सोमवारचे दर (रुपये/लीटर) मंगळवारचे दर (रुपये/लीटर) वाढ
दिल्ली 72.83 72.97 14 पैसे
मुंबई 77.32 77.47 15 पैसे

 

सध्या केंद्र सरकार एक लीटर पेट्रोलवर 19.48 आणि डिझेलवर 15.33 रुपये एक्साइज ड्युटी वसूल करत आहे. सरकारने सोमवारी पुन्हा एकदा एक्साइज ड्युटी कम करण्यास सरकारने नकार दिला आहे. 

 


Loading...

Recommended


Loading...