Loading...

कर घटवल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा अाहे. आरक्षण देण्यासाठी मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कायदा करावा लागणार आहे.

Divya Marathi Sep 12, 2018, 11:53 IST

नगर- मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा अाहे. आरक्षण देण्यासाठी मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कायदा करावा लागणार आहे. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले, तर दरही कमी होतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


आठवले म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा पूर्वीपासूनच पाठिंबा आहे. आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी कायदा करावा लागेल. मराठा व दलित वितुष्ट हे समाजाच्या हिताचे नाही. 


लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युती झाली, तर आरपीआय २ जागांची मागणी करणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असेल, तर आरपीआय १२ ते १३ जागांची मागणी करेल. ही निवडणूक स्वबळावर झालीच, तर आरपीआय २५ ते ३० जागांची मागणी करणार आहे. आरपीआयच्या वतीने सर्वसाधारण प्रवर्गालाही उमेदवारी दिली जाणार आहे. 


विचारवंतांना पकडू नये 
कोणी माओवादी किंवा मार्क्सवादी आहे, म्हणून विचारवंतांची धरपकड करू नये. ज्यांचा हिंसक घटनेशी संबंध असेल त्यांनाच पकडावे. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये. दलित पँथरच्या काळात आम्हाला कधी नक्षलवादी म्हणून पकडले नाही. एल्गार परिषदेचा व भिमा कोरेगाव प्रकरणाचा काहीच संबंध नाही. मनोहर भिडेच्या अटकेसाठी पुरावे तपासून कारवाई करावी, असेही आठवले यांनी सांगितले. 


Loading...

Recommended


Loading...