Loading...

रिकामी पाण्याची बाटली यंत्रात टाकल्यास मिळणार क्रेडिट कूपन स्वरूपामध्ये १ रुपया

पेप्सिको इंडियाने जेम एनवायरो मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिल्या पेट बोटल्स रिसायकलिंग मशिनचा शुभारंभ शिर

Divya Marathi Sep 07, 2018, 10:34 IST

शिर्डी/ नाशिक- पेप्सिको इंडियाने जेम एनवायरो मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिल्या पेट बोटल्स रिसायकलिंग मशिनचा शुभारंभ शिर्डीच्या साईमंदिर परिसरात गुरुवारी करण्यात अाला. पाणी किंवा शीतपेयाची रिकामी बाटली या यंत्रात टाकल्यास प्रत्येक बाटलीसाठी एक रुपयांचे क्रेडिट कूपन मिळेल अशी ५ कूपन्स जमा केल्यास अर्धा लिटरची तर १० कूपन्स जमा केल्यास १ लिटरची पाण्याची बाटली संस्थान संबंधितांना देईल. त्याचबराेबर ही क्रेडिट कूपन्स पेटीएमसारख्या अॅपवर राेख स्वरूपातही जमा करता येतील. देशभरातील या स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम अाहे. त्यामुळे पेट बॉटल्स जमवणे आणि वापरलेल्या पेट बॉटल्सचा पुनर्वापर करणे शक्य झाले आहे. 


रिव्हर्स व्हेंडिंग मशिन्स आणि संकलन केंद्र शिर्डी येथे स्थापन केले जाणार असून जिथे ग्राहक त्यांच्या वापरलेल्या पेट बॉटल्स जमा करू शकतील. विशेष म्हणजे पुढील महिन्यात त्र्यंबकेश्वर येथेही असे मशिन बसविण्याचे सूताेवाच कंपनीने केले अाहे. 


या उपक्रमांतर्गत पहिले रिव्हर्स वेंडिंग मशिनचा शुभारंभ साईबाबा मंदिर आवारात खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, सीईअाे रुबल अग्रवाल, जेम एनवायरोचे संचालक सचिन शर्मा आणि पेप्सिकाे इंडियाच्या उपाध्यक्षा नीलिमा द्विवेदी अादी उपस्थित होत्या. प्रत्येकी ६ लाख ५० हजार रुपये किंमत असलेली अशी पाच यंत्रे साईबाबा संस्थानला देण्यात येणार अाहेत. 


प्लास्टिक उत्पादनांच्या पॅकेजिंगचा पर्यावरणावर होणारा परिणाम 'कमी' करण्यासाठी आणि वापरलेल्या प्लास्टिक पॅकेजिंगच्या रिसायकलिंगमध्ये वाढ करायचे प्रयत्न अाम्ही सुरू केले आहे. रिसायकलिंग पायाभूत सुविधांची स्थापना करण्याबरोबरच, आमचा असा विश्वास आहे की शिर्डीत मोहीम हाती घेऊन हजारो भाविकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह पेट बॉटल्सची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणेही शक्य होऊ शकेल, पाच मशिन्स शिर्डीत लावले जाणार असल्याचे नीलिमा द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. शिर्डीत देशाच्या विविध भागातून लाखो भाविक येतात, पेप्सिकोसारख्या कंपन्या स्वच्छ पर्यावरणासाठी पुढे येत असल्याचा आनंद असल्याचे डाॅ. हावरे यांनी यावेळी मनाेगतात सांगितले. 


Loading...

Recommended


Loading...