Loading...

हार्दिक पटेल रुग्णालयात दाखल, पाटीदार आरक्षणासाठी 14 दिवसांपासून सुरू आहे उपोषण

गुजरातमधील पाटीदार समाजाला अारक्षण द्यावे व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून बेमुदत उपाेषण

Divya Marathi Sep 08, 2018, 07:08 IST

अहमदाबाद- गुजरातमधील पाटीदार समाजाला अारक्षण द्यावे व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून बेमुदत उपाेषणाला बसणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत अाहे. शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २५ अाॅगस्टपासून त्यांनी हे उपाेषण सुरू केलेले अाहे. शुक्रवारी त्यांना अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात अाले. सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयाबाहेर हार्दिक यांचे शेकडाे समर्थक जमले असून माेठा पाेलिस बंदाेबस्तही वाढवण्यात अाला अाहे. 


शुक्रवारी त्यांना अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात अाले. सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयाबाहेर हार्दिक यांचे शेकडाे समर्थक जमले असून माेठा पाेलिस बंदाेबस्तही वाढवण्यात अाला अाहे.  हार्दिक यांच्या उपाेषणाला काँग्रेस, समाजवादी पार्टीसह भाजपविराेधी बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला अाहे. इतकेच नव्हे तर भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनीही पटेल यांच्या मागण्यांचे समर्थन केले अाहे.

 


Loading...

Recommended


Loading...