Loading...

पाकचे तज्ज्ञ चिनाब प्रकल्पांना महिनाअखेरीस भेट देणार; पाकिस्तानातील माध्यमांनी केला दावा

चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाबाबत पाकिस्तानच्या अडचणी, तक्रारी दूर करण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जलतज्ज्ञांना

Divya Marathi Sep 01, 2018, 06:47 IST

लाहोर- चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाबाबत पाकिस्तानच्या अडचणी, तक्रारी दूर करण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जलतज्ज्ञांना सप्टेंबरमध्ये प्रकल्पास भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे, असा दावा पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानच्या आक्षेपाला न जुमानता भारताने या प्रकरणात कामाला गती दिल्याने दोन्ही देशांत त्यावरून तणाव आहे. 


सिंधू जलकराराबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात दोनदिवसीय बैठकीचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले होते. या बैठकीचा शुक्रवारी समारोप झाला. उच्चस्तरीय बैठकीत अधिकारी पातळीवर कराराविषयी सहमती व्यक्त करण्यात आली. भारतातील पाकल डुल धरण व लोअर कलनाई जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामास पाकिस्तानने विरोध दर्शवला होता. परंतु भारताने पाकिस्तानचा आक्षेप फेटाळून लावला आहे. प्रकल्पांच्या बांधकामास रोखण्यात आलेले नव्हते. पाकल डुल धरणावरील जलविद्युत प्रकल्प १ हजार मेगावॅटचा तर कलनाई ४८ मेगावॅटचा प्रकल्प आहे. भारताने सातत्याने बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे १९६० मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सिंधू जल वाटपासंबंधीची करार झाला होता. अगोदर दोन्ही देशांच्या जल आयुक्तांनी वर्षातून दोन वेळा भेटण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पाकला अडचणी आल्याने बैठकांचे सत्र बंद होत गेले. 


आक्षेपाचे कारण काय ?

सिंधू जलवाटप करारानुसार नद्यांच्या प्रवाहावर इतर कोणत्याही प्रवाहाचा वाईट परिणाम होऊ नये, असे वाटते. त्याबाबत आमच्या मनात काही शंका आहेत. पण आमच्या समस्या भारताने ऐकून घ्याव्या, अशी आमची इच्छा होती. त्यानुसार भारताचे मन वळवण्यात आम्हाला यश मिळाले आहे, असे पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने पाकल डुल धरणाच्या जलसाठ्याची क्षमता ५ मीटरने कमी करावी. समुद्रसपाटीपासून हे धरण ४० मीटर उंचीवर असावे. जलविद्युत प्रकल्पाच्या आराखडा हा सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्याचा दावा पाकने केला. 


प्रकल्पांचे परीक्षण करणार, महिनाअखेरीस भेटीची योजना 
दोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करारासंबंधी उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानच्या तज्ज्ञांना चिनाबवरील प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भारताने परवानगी दिली. आमचा तज्ज्ञांचा चमू भारतातील या ठिकाणांना भेट देऊन प्रकल्पांचे परीक्षण करणार आहे, अशी माहिती पाकिस्तानचे जलस्रोत सचिव शामील अहमद ख्वाजा यांनी दिली. हा दावा 'डॉन' ने केला आहे. पाकिस्तानचे तज्ज्ञ हा प्रकल्प सिंधू कराराच्या कक्षेत येऊ शकतात का, याची चाचपणी करणार आहेत. 


Loading...

Recommended


Loading...