Loading...

Yemen: 10 वर्षांच्या मुलावर रेप, हत्या; दोषींना भर चौकात गोळ्या घालून असे लटकवले

भर चौकात त्यांचे मृतदेह लटकावून सर्वांना संदेश दिला की बलात्काऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल.

Divya Marathi Aug 09, 2018, 17:53 IST

सना - येमेनमध्ये 10 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरणात 3 जणांना मृत्यूदंड सुनावण्यात आला. यानंतर प्रशासनाने त्या तिन्ही नराधमांना सना येथील भर चौकात आणून गोळ्या घातल्या. तसेच तिघांनाच्याही मृतदेहांना एका क्रेनला बांधून फासावर लटकवण्यात आले. दोषींना गोळ्या घालण्यापासून ते त्यांचे मृतदेह फासावर लटकवण्यापर्यंत संपूर्ण घटना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. या संपूर्ण घटनाक्रमाचे फोटो समोर आले असून ते सध्या व्हायरल होत आहेत. 


पालथे झोपवले, हृदयाचा नेम धरून झाडल्या प्रत्येकी 5 गोळ्या 
येमेनचे सर्वात मोठे शहर आणि जुनी राजधानी सना येथे पोलिस, सैनिक आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत हा मृत्यूदंड देण्यात आला. यावेळी सर्व दोषींना निळे सूटमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून चौकात आणले. यानंतर कमांडोने त्यापैकी एकाला चटाईवर पालथे झोपण्यासाठी फोर्स केले. पालथे झोपताच त्याच्या पाठीवर हृदयाचा नेम धरून 5 गोळ्या झाडल्या. उर्वरीत कैद्यांसोबतही त्यांनी असेच केले. यानंतर उपस्थित डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला किंवा नाही याची तपासणी केली. मग, पोलिसांनी त्या तिघांच्या गळ्यात दोरी बांधून एका क्रेनवर लटकवले. भर चौकात त्यांचे मृतदेह लटकावून सर्वांना संदेश दिला की बलात्काऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल. 


हौथी बंडखोरांच्या नियंत्रणात आहे सना...
2015 मध्ये हौथी बंडखोरांनी सनावर हल्ला केला. त्यावेळी हे शहर येमेनची राजधानी होती. हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अब्दरब्बुह मंसूर हादी यांच्या नेतृत्वातील लोकनिर्वाचित सरकारला अदेन शहरात पळ काढावा लागला. आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या या सरकारने अदेनला तात्पुरती राजधानी घोषित केली. तेव्हापासून सना आणि निम्म्या येमेनवर हौथी बंडखोरांचे राज्य आणि उर्वरीत देशात हादी यांचे सरकार आहे.


Loading...

Recommended


Loading...