Loading...

आईने दिली मुलगा हरवल्याची तक्रार; वेग-वेगळ्या ठिकाणी सापडले त्याच्या शरिराचे तुकडे

10 वर्षाच्या मुलाच्या शेधाचा शेवट अतिशय ह्रदयद्रावक होता. मुलाच्या आईने काही दिवसांपूर्वी तो हरवल्याची तक्रार दाखल केली

Divya Marathi Sep 10, 2018, 12:45 IST

सेंट पीटर्सबर्ग- 10 वर्षाच्या मुलाच्या शेधाचा शेवट अतिशय ह्रदयद्रावक होता. मुलाच्या आईने काही दिवसांपूर्वी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोध सुरू केला, तेव्हा त्यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आणि बेपत्ता मुलाचा शोध लागला. एका 35 वर्षाच्या व्यक्तिने मुलाला मीठाईचे आमिष दाखवले आणि आपल्या घरी नेऊन त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याची हत्या करून शरीराचे तुकडे केले. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात त्याच्या शरिराचे तुकडे आढळून आले आहे.


सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला पुरावा...
- ही घटना सेंट पीटर्सबर्गची आहे, येथील 10 वर्षाचा रुसलान कोरोलेव घरी परतला नाही, त्यामुळे आईने पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दाखल केली.
- पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमधून पुरावा हाती लागाला. फुटेजमध्ये मुलगा हरवल्यानंतर शेलटी एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसला होता.
- रेल्वे स्टेशनवर अलेक्सांद्रा जियोर्जिवेस्की नावाच्या 35 वर्षाच्या व्यक्तीसोबत तो दिसला. त्याने मुलाला आधी दुकानावर नेले. त्यानंर मिठाईच्या बहाण्याने तो त्याला आपल्या घरी घेऊन गेला.
- आरोपीची आपार्टमेंट सेंट पीटर्सबर्गपासून 21 मैल दूर ओर्चातादनोएमध्ये होते. तिथेच त्याने आधी मुलावर लैंगिक आत्याचार केले आणि नंतर त्याची हत्या केली.
- एवढेच नाही, तर पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मुलाचे तुकडे केले  आणि ते लपवण्यासाठी पीटर्सबर्गच्या वेग-वेगळ्या भागात फेकून दिले.


वेग-वेगळ्या ठिकाणी सापडले मुलाचे तुकडे...
- आरोपी अलेक्सांद्रा याला सीसीटीव्ही फुटेज समोर येताच अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या शरिराचे तुकडे गोळा केले.
- पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण आधी मुलागा हरवल्याचे वाटत होते, परंतु जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या शरिराचे तुकडे आढळून आले तेव्हा या तपासाने वेगळे वळण घेतले.  
- या आठवड्यात कोर्टाने अलेक्सांद्राला मुलाचे हिंसक लैंगिक शोषण आणि हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले आङे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
- अलेस्सांद्रावर 17 वर्षाच्या वयात देखील एका मुलावर हिंसक सेक्स अटॅकच्या आरोप करण्यात आला होता त्यासाठी त्याला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.


Loading...

Recommended


Loading...