Loading...

Oppo Realme 2 भारतात लाँच: नॉच्ड डिस्प्ले, फिंगरप्रिंट सेंसरसह Face Unlock; किंमत 8,990 पासून सुरू...

चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने आपल्या सब-ब्रँड Realme अंतर्गत नवीन स्मार्टफोन Realme 2 मंगळवारी भारतात लाँच केला आहे.

Divya Marathi Aug 28, 2018, 17:56 IST

गॅजेट डेस्क - चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने आपल्या सब-ब्रँड Realme अंतर्गत नवीन स्मार्टफोन Realme 2 मंगळवारी भारतात लाँच केला आहे. Realme 1 मध्ये कंपनीने फेस अनलॉक फीचर दिले होते. नव्या फोनमध्ये कंपनीने फेस अनलॉकसह रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा दिला आहे. हा स्मार्टफोन दोन व्हॅरिएन्टमध्ये भारतात येत आहे. यापैकी पहिला 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज आणि दुसरा 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजसह मिळणार आहे. 


4 सप्टेंबरपासून विक्री
Oppo Realme 2 ची विक्री 4 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज व्हॅरिएन्टची किंमत 8,990 रुपये आणि 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन खरेदी करताना ऑफर सुद्धा आहे. आपल्याकडे HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास त्यावर 750 पर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. या व्यतिरिक्त रिलायन्स जिओ आपल्याला 4200 रुपयांपर्यंतच्या ऑफर या स्मार्टफोनसोबत देणार आहे. 


असे आहेत फीचर्स...

फीचर्स Oppo Realme 2
डिस्प्ले 6.2 इंच HD+IPS
प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 450
रॅम 3 जीबी/ 4 जीबी
स्टोरेज 32 जीबी/ 64 जीबी
फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल
रियर कॅमेरा 13+2 मेगापिक्सल
सिक्युरिटी फेस अनलॉक/ फिंगरप्रिंट सेन्सर
बॅट्री 4230mAh
कनेक्टिव्हिटी 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटुथ


Loading...

Recommended


Loading...