Loading...

पहिल्याच सेलमध्ये आउट ऑफ स्टॉक झाला Oppo Realme 2, आता 11 सप्टेंबरला Flipkart वर फ्लॅश सेल; मिळणार या ऑफर्स

चिनी कंपनी Oppo ने आपल्या सब-ब्रँड अंतर्गत 28 ऑगस्ट रोजी Realme 2 लॉन्च केला होता.

Divya Marathi Sep 05, 2018, 00:14 IST

गॅजेट डेस्क - चिनी कंपनी Oppo ने आपल्या सब-ब्रँड अंतर्गत 28 ऑगस्ट रोजी Realme 2 लॉन्च केला होता. या फोनची पहिली विक्री मंगळवारी फ्लॅश सेलमध्ये करण्यात आली. दुपारी 12 वाजता सुरू होताच फोन आउट ऑफ स्टॉक झाला. यानंतर पुढची सेल 11 सप्टेंबरला होणार आहे. हे स्मार्टफोन दोन व्हॅरिएंटमध्ये आले आहे. पहिला 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज आणि दुसरा 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजसह मिळत आहे. 


स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज व्हॅरिएन्टची किंमत 8,990 रुपये आणि 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन खरेदी करताना ऑफर सुद्धा आहे. आपल्याकडे HDFC बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास त्यावर 750 पर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. रिलायन्स जिओ आपल्याला 4200 रुपयांपर्यंतच्या ऑफर या स्मार्टफोनसोबत देणार आहे. यासोबतच Axis बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास फोनवर 10% डिस्काउंट मिळत आहे.

 

असे आहेत फीचर्स

फीचर्स Oppo Realme 2
डिस्प्ले 6.2 इंच HD+IPS
प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 450
रॅम 3 जीबी/ 4 जीबी
स्टोरेज 32 जीबी/ 64 जीबी
फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल
रियर कॅमेरा 13+2 मेगापिक्सल
सिक्युरिटी फेस अनलॉक/ फिंगरप्रिंट सेन्सर
बॅट्री 4230mAh
कनेक्टिव्हिटी 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटुथ

 


Loading...

Recommended


Loading...