Loading...

14 वर्षांच्या मुलावर लागला 59 च्या महिलेवर बलात्काराचा आरोप, मग समोर आले हे वास्तव

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 59 वर्षीय महिलेने अवघ्या 14 वर्षांच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला आहे.

Divya Marathi Sep 07, 2018, 00:01 IST

लंडन - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 59 वर्षीय महिलेने अवघ्या 14 वर्षांच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला आहे. इबीझा येथे सुट्टीवर असताना त्या मुलाने आपल्यावर बळजबरी केली आणि बलात्कार केला असे तिने कोर्टात म्हटले आहे. महिलेवर कथित बलात्कार झाला त्यावेळी अल्पवयीन मुलाचे आई-वडील आणि आजी आजोबा त्याच अपार्टमेंटमध्ये होते. तो सेक्स करण्यासाठी अगदी पिसाटला होता असा दावा तिने केला. कोर्टात सुनावणी सुरू असताना त्या मुलाच्या वकिलांनी वेगळेच सत्य समोर आणले आहे.


आम्ही गॅलरीत होतो, तो अक्षरशः पिसाटला होता...
गेल डिकिन्स या महिलेने कोर्टात दिलेल्या जबाबानुसार, इबीझा येथील फ्लॅटच्या गॅलरीमध्ये असताना 14 वर्षीय मुलाने तिची छेड काढली. यानंतर तिचा पाठलाग सुरू केला. ती ज्या इमारतीमध्ये होती त्याच इमारतीमध्ये तो आपल्या आजी आणि आई-वडिलांसोबत थांबला होता. ती पुढे सांगते, की त्या मुलाने कुठल्याही परिस्थितीत तिच्याबरोबर सेक्स करण्याचे ठरवले होते. गॅलरीतच त्याने महिलेसोबत कथितरित्या ओरल सेक्स सुरू केले. जास्त ड्रिंक घेतलेली असल्याने आपल्याला यानंतरचे काहीही आठवत नाही असे तिने कोर्टात म्हटले.


मग समोर आले हे सत्य...
कोर्टात मुलाच्या आजीने आपला प्रत्यक्षदर्शी जबाब नोंदवला. त्यानुसार, आरोप लावणारी महिला तिच्याच वयाची आहे. मुलाची आजी अपार्टमेंटमध्ये असताना तिने या महिलेला आणि आपल्या नातूला सेक्स करताना पाहिले होते. परंतु, आपल्या वयाची महिला आपल्या नातूसोबत असे करत असल्याचे पाहून ती स्तब्ध झाली होती. धक्का बसल्याने ती त्यावेळी काहीच बोलू शकली नाही. यानंतर यासंदर्भात कुटुंबियांना सांगितले आणि तक्रार दाखल केली. परंतु, त्या महिलेने कोर्टात आपल्यावरच बलात्कार झाल्याचे आरोप करून केस पलटवण्याचा प्रयत्न केला. 


वकिलांनी विचारले तेव्हा...
मुलाच्या वकिलांनी गेल डिकिन्सनचे आरोप लक्षपूर्वक ऐकले त्यानंतर तिला बलात्काराची व्याख्या विचारली. त्यावर डिकिन्सन म्हणाली, की ओरल सेक्स करणे हाच बलात्कार असतो. वेगवेगळे प्रश्न विचारल्यानंतर त्या महिलेने आपण जास्त ड्रिंक केल्याने शुद्धीवर नव्हतो अशी कबुली दिली. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाला नशेत आणून त्याचा गैरफायदा घेतला. ही महिला लहान मुलांवर अत्याचार करणारी सैतान असून कोर्टाने तिला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी वकिलांनी केली. परंतु, कोर्टाने तिच्यावरील सर्व आरोप रद्द करून तिची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाच्या या निकालावर मुलाचे नातेवाइक हैराण आहेत.

 


Loading...

Recommended


Loading...