Loading...

प्रतिक्षा संपली...लूकच्या बाबतीत ऑडी, रेंज रोवरसारख्या महागड्या कारला टक्कर देते महिंद्राचीही स्वस्त SUV, मायलेजही जास्त

महिंद्राने नुकतीच शार्क मास्याच्या डिझाइनसारख्या पार्ट्सची मराजो कार लाँच केली.

Divya Marathi Sep 11, 2018, 11:18 IST

ऑटो डेस्क: महिंद्राने नुकतीच शार्क मास्याच्या डिझाइनसारख्या पार्ट्सची मराजो कार लाँच केली. आता कंपनीने आपली मोस्ट अवेटेड Y400 SUV लाँच करण्याची तयारी केली आहे. असे मानले जात आहे की, या कारचे नाव महिंद्रा XUV 700 किंवा महिंद्रा रेक्सटॉन असू शकते. ही महिंद्राची फ्लॅगशिप एसयूव्ही असेल. याची सेलिंग 9 ऑक्टोबर, 2018 पासून सुरु होईल. 

 

7 सीटरची SUV कार 
ही महिंद्राची नवीन प्रीमियर SUV असेल. यामध्ये 7 सीट असतील. भारतीय कुटूंबानुसार हे डिझाइन करण्यात आले आहे. कंपनीने याचे फ्रंट पुर्णपणे बदलले आहे. लुक्सविषयी बोलायचे झाले तर यामध्ये व्हर्टिकल स्लेटेड ग्रिल, मॉडिफाइड बंबपर्स, भारतीय रस्त्यांसारखे सस्पेंशन सेटअप दिले जाईल. महिंद्राने  Y400 ला ऑटो एक्स्पो 2018 मध्ये शोकेस केले होते. 

 

फीचर्स आणि किंमत 
Y400 SUV मध्ये 2.2 लीटचे 4-सिलेंडर टर्बो डीजेल इंजन मिळेल. जे  187bhp आणि 420Nm ची टॉर्क जनरेट करेल. यामध्ये 7-स्पीड ऑटोमॅटिक गियर बॉक्स मिळतील. हे मॅन्यूअल ट्रान्समिशनसोबत येईल. यामध्ये 9.2 इंच टचस्क्रीनचे इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. कंपनीने अजून याच्या फिचर्सविषयी जास्त माहिती शेअर केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कारचे मायलेज 20kmpl असेल. तर किंमत 12 ते 15 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते.

 

या SUV ने सुरु होईल स्पर्धा 
महिंद्राच्या या दमदार SUV ची स्पर्धा इंडियन ऑटो मार्केटमध्ये Isuzu MU-X, टोयोटा फॉर्च्यूनर, फोर्ड एंडेवर, Honda CR-V आणि मित्शुबिशी पजेरो स्पोर्ट्ससोबतच ऑडी आणि रेंज रोवर सारख्या महागड्या कारशी होऊ शकतो. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा Mahindra Y400 SUV चे काही फोटोज...
 


Loading...

Recommended


Loading...