Loading...

नागराज मंजुळेसह 'सैराट'मधील आर्ची-परशा मनसेच्या इंजिनावर स्वार, चित्रपट सेनेत केला प्रवेश

मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपल्या सुपरहिट “सैराट’ चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर आणि नायिका रिंकू राजगुरू यांच्यासह

Divya Marathi Sep 12, 2018, 15:24 IST

मुंबई- मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपल्या सुपरहिट “सैराट’ चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर आणि नायिका रिंकू राजगुरू यांच्यासह मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश करून सभासदत्व स्वीकारले. मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी हा संपूर्ण कार्यक्रम फेसबुक लाइव्ह केला. मनसे चित्रपट सेनेचे काम आवडल्यानेच या तिघांनी संघटनेत प्रवेश केल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले.   


या वेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, मनसे चित्रपट सेना गेल्या १२ वर्षांपासून काम करत असून अनेक हिंदी आणि मराठी कलाकार आमच्या चित्रपट सेनेशी जोडले गेलेले आहेत. आणि आज नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आमच्या चित्रपट सेनेचे सदस्य होत आहेत. यातून कसलाही अर्थ काढू नये, असेही खोपकर या वेळी म्हणाले.   


नागराज म्हणाले, मनसे चित्रपट सेना चित्रपटातील कलाकारांसाठी खूप काम करते. त्यामुळेच आम्ही चित्रपट सेनेचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. आकाशने ठोसरनेहही मनसे चित्रपट सेना खूप चांगले काम करत असून चित्रपटसृष्टीतील कोणालाही काहीही समस्या असेल तर मदतीला धावून येते म्हणून आम्ही सदस्यत्व घेतले आहे. रिंकूनेही सदस्यत्व घेतल्याचे सांगत अधिक काही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, या  वेळी रिंकू राजगुरू हिचे वडीलही उपस्थित होते.

 


Loading...

Recommended


Loading...