Loading...

तुमच्या खिशातील मोबाईलच्या बॅटरीबाबत सर्रास बोलले जाते हे खोटे, वाचा अशाच 5 गोष्टी

चार्जर चांगले काम करत असेल तोपर्यंत बॅटरीला काहीही नुकसान होणार नाही, मग चार्जर कोणत्याही कंपनीचे असले तरी.

Divya Marathi Sep 05, 2018, 00:05 IST

नवी दि‍ल्‍ली - स्‍मार्टफोनची बाजारपेठ दिवसेंदिवस मोठी होत आहे. आजघडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे, बॅटरी. कारण जर तुम्ही इंटरनेट सुरू ठेवले असेल तर बॅटरी दिवसभर चालणेही कठीण ठरते. त्यामुळे स्मार्टफोनसाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट बॅटरी ठरतो आणि त्यामुळे त्याची निगा राखणेही गरजेचे आहे. पण मोबाईल बॅटरीबाबत अनेक भ्रामक गोष्टी पसरलेल्या आहेत. तसे असले तरी जोपर्यंत तुमचे चार्जर चांगले काम करत असेल तोपर्यंत बॅटरीला काहीही नुकसान होणार नाही, मग चार्जर कोणत्याही कंपनीचे असले तरी. पण जर चार्जरच खराब असेल तर बॅटरी खराब होऊ शकते. 

 
1. गैरसमज काय 
जास्त चार्ज केल्याने बॅटरी खराब होते.. 
सत्य काय 
नेहमी असे म्हटले जाते की, जास्त चार्ज केल्याने बॅटरी खराब होते. पण हे सत्य नाही. कारण सध्या येणाऱ्या स्मार्टफोनमधील बॅठरी चार्जिंग फुल झाल्यास स्वतःच करंट घेणे बंद करतात. त्यामुले हे सत्य नाही. पण सारखी चार्जिंग सुरू राहिल्यास वीज नक्कीच वाया जाते. 

 

पुढे वाचा, बॅटरीबाबतचे इतर काही गैरसमज.. 
 


Loading...

Recommended


Loading...