Loading...

बाइक Modify करण्यापूर्वी आवश्य वाचा हे नियम; अन्यथा पोलिस फाडतील दंडाची पावती

यात चुकीचे काहीच नाही पण असे करताना तुम्ही आरटीओच्या कोणत्या नियमाचे उल्लंघन तर करीत नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे

Divya Marathi Sep 03, 2018, 00:04 IST

युटिलिटी डेस्क - बाईक शौकिन आपल्या दुचाकीला अनेक मोडिफाय करतात. यात तरुणाईची विशेष आघाडी असते. लूक आणि स्टाईलसाठी ते असे करत असतात. यात चुकीचे काहीच नाही पण असे करताना तुम्ही आरटीओच्या कोणत्या नियमाचे उल्लंघन तर करीत नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे वाहन जप्तही होऊ शकते.


मोटार वाहन कायदा 1988 नुसार फॅक्ट्री मॉडेलमध्ये करण्यात आलेला कोणताही बदल हा बेकायदेशीर असतो. असा कोणताही बदल ज्यामुळे वाहनाचे वजन 10 पटीने वाढेल करायचा असल्यास तो वाहन निर्मात्यास आणि आरटीओला कळवणे बंधनकारक आहे. तुम्ही असा बदल केल्यास तुमचे वाहन जप्त होऊ शकते तसेच तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते.


नवा एक्झॉस्ट
- अनेक स्वस्त दुचाकी या एक्झॉस्ट फ्री फ्लो असणाऱ्या आणि कॅटेलिटिक कन्वर्टर असणाऱ्या असतात. या दुचाकीतुन बाहेर पडणाऱ्या विषारी घटकांपासून पर्यावरणाचे रक्षण करतात. पण फ्री फ्लो एक्झॉस्ट दुचाकीतुन निघणारा आवाजही वाढवतो. फ्री फ्लो एक्झॉस्ट लावल्याने होणारे नुकसान जास्त आहे. जास्त आवाज आणि उर्त्सजित होणाऱ्या घटकांमुळे आरटीओ आणि पोलिस तुमच्यावर कारवाई करु शकतात. तुमचे वाहनही ते जप्त करु शकतात.


पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी महत्वाची माहिती...


Loading...

Recommended


Loading...