Loading...

नव-याच्या प्रेमात ऐश्वर्याने सोडला आणखी एक चित्रपट! आतापर्यंत धुडकावून लावले आहेत 15 चित्रपट

अभिषेक बच्चनसोबतच्या \'गुलाब जामुन\'साठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने संजय लीला भन्साळींचा चित्रपट नाकारला.

Divya Marathi Sep 12, 2018, 00:47 IST


मुंबई: अभिषेक बच्चनसोबतच्या 'गुलाब जामुन' या चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने संजय लीला भन्साळींचा अद्याप नाव न ठरलेला चित्रपट नाकारला. त्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्याने एका चित्रपटाला आपला नकार दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रेरणा अरोराने काही महिन्यांपू्र्वी 1964 मध्ये आलेल्या 'वो कौन थी' या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चनला अप्रोच करण्यात आले होते. पण मेकर्सनी हा चित्रपट होल्ड केला. कारण ते आता दुस-या चित्रपटात बिझी आहेत. प्रेरणा अभिषेक कपूरसोबत 'केदारनाथ' आणि भूषण कुमारसोबत 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटांमुळे कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. 


प्रेरणा आता चित्रपट बनवायला तयार, पण ऐश्वर्याने सोडला चित्रपट..  

- प्रेरणाने अलीकडेच तिचे प्रॉडक्शन हाऊस री-लाँच केले आणि ती आता 'वो कौन थी'च्या रिमेकवर काम करत आहे. पण रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याने हा चित्रपट करायला नकार दिला असून तिच्या जागी आता बिपाशा बसूची वर्णी लागली आहे. याविषयी प्रेरणाला विचारले गेले असता, सध्या तर्कवितर्क लावू नका, योग्य वेळी चित्रपटाविषयीची घोषणा करण्यात येईल, असे ती म्हणाली. ऐश्वर्याविषयी सांगायचे झाल्यास, ती पती अभिषेक बच्चनसोबत 'गुलाब जामुन' हा चित्रपट करत असून तिने दुसरा चित्रपट साइन केलेला नाही, अशी चर्चा आहे.

 

ऐश्वर्याच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचे झाल्यास, तिने यापूर्वीही अनेक चित्रपट धुडकावून लागवले आहेत. तर काही प्रोजेक्टमधून ती बाहेर झाली. उदाहरणार्थ 'हॅप्पी न्यू ईयर' या चित्रपटासाठी  फराह खानने ऐश्वर्याला अप्रोच केले होते. फराह तिला शाहरुखच्या अपोझिट कास्ट करु इच्छित होती. पण ऐश्वर्याची इच्छा होती की, तिला अभिषेकच्या अपोझिट कास्ट करण्यात यावे. जेव्हा फराहने तिची अट मान्य केली नाही, तेव्हा ऐश्वर्याने चित्रपट नाकारला. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ऐश्वर्याने नाकारलेल्या आणखी 14 चित्रपटांविषयी...

 

 


Loading...

Recommended


Loading...