Loading...

Movie Review : हॅप्पीच्या भूमिकेत सोनाक्षीने ओतले प्राण, फुल टू फॅमिली एन्टटेन्मेंट

डायना पँटीची पळून जाण्याची कहानी पाहिली असेल, तर \'हॅप्पी भाग जाएगी फिर से\' अवश्य पाहू शकता.

Divya Marathi Aug 24, 2018, 15:18 IST
क्रिटिक रेटिंग 3.5/ 5
स्टार कास्ट सोनाक्षी सिन्हा, डायना पेंटी, अली फजल, जिम्मी शेरगिल, पीयूष मिश्रा, अपारशक्ति खुराना
डायरेक्टर मुदस्सर अजीज
प्रोड्यूसर आनंद एल राय, कृषिका लुल्ला
जोनर कॉमेडी
कालावधी 135 मिनिटे 

 

 

बॉलिवूड डेस्क: डायना पँटीची पळून जाण्याची कहानी पाहिली असेल, तर 'हॅप्पी भाग जाएगी फिर से' अवश्य पाहू शकता. अनेक चित्रपटांनंतर हा चित्रपट सोनाक्षीसाठी जीवनदान म्हटला जाऊ शकतो. पंजाबी टचमुळे सोनाक्षी एकदम बदललेली दिसतेय. चित्रपटाचे कॉमिक टायमिंग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधलेले राहते. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही कम्पलीट एन्टटेनर आहे. 


'हॅप्पी फिर भाग जाएगी'ची कथा
डायरेक्टर मुदस्सर अजीजने 2016 मध्ये 'हॅप्पी भाग जाएगी' चित्रपट बनवला होता. आता नवीन स्क्रिप्ट घेऊन मुदस्सरने 'हॅप्पी फिर भाग जाएगी' चित्रपट बनवला आहे. यावेळी हॅप्पी पाकिस्तानात नाही, तर चायनामध्ये पळाली आहे. चित्रपटात दोन-दोन हॅप्पी आहेत. यामुळे खुपच धावपळ होते. ही कथा पाकिस्तान किंवा भारतात नाही, तर चीनमध्ये सुरु होते. चीनच्या शंघाई एयरपोर्टवर हॅप्पी (डायना पेंटी) आपला पती गुड्डू(अली फजल)सोबत म्यूझिक कन्सर्टमध्ये आलेली आहे. तर दूसरी हॅप्पी(सोनाक्षी सिन्हा) शंघाईच्या एका यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरचा जॉब जॉइन करण्यासाठी येते. 

 

- एयरपोर्टवर काही चीनी किडनॅपर पहिल्या हॅप्पी(डानसा पेंटी)ला किडनॅप करण्यासाठी येतात. परंतू एकच नाव असल्यामुळे ते चुकून दूसरी हॅप्पी(सोनाक्षी सिन्हा)ला किडनॅप करतात. यासोबतच किडनॅपर हे भारतातून दमन सिंह बग्गा (जिम्मी शेरगिल)ला त्याच्या लग्नातून आणि पाकिस्तानातून उस्मान अफरीदी(पीयूष मिश्रा) ला त्याच्या रिटायरमेंट पार्टीमधून उचलतात. 


- याच काळात किडनॅपरच्या जाळ्यातून सुटून हॅप्पी ही भारतीय एंबेसीमध्ये काम करणारा पंजाबी मुलगा खुशवंत सिंह उर्फ खुशी(जस्सी गिल)ला भेटते. यानंतर कन्फ्यूजन आणि मजेदार ट्वीस्ट सुरु होतात. आता किडनॅपरला पहिल्या हॅप्पीला का पकडायचे आहे? दोन्ही हॅप्पीचे हे कन्फ्यूजन कसे होते? हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहून कळेल. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

 


Loading...

Recommended


Loading...