Loading...

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांतील संशयिताचा पंचवटीत खून

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित तरुणाचा निर्घून खून करण्यात आला. मंगळवारी (दि. ११) रात्री ९ वाजता फुलेनगर येथील पाटा

Divya Marathi Sep 12, 2018, 10:40 IST

नाशिक- मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित तरुणाचा निर्घून खून करण्यात आला. मंगळवारी (दि. ११) रात्री ९ वाजता फुलेनगर येथील पाटाच्या किनारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर परिसरातील प्रवीण अरूण लोखंडे (२९) याच्यावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र हल्लेखोरांचा तपास लागला नाही. रात्री उशिरापर्यंन्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. लाेखंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, हणामारी, दरोडा आदी गंभीर गुन्हे दाखल आहे. 


Loading...

Recommended


Loading...