Loading...

अाधी खेद व्यक्त, नंतर दिलगिरी; अाता माफी अन‌् तीही टि‌्वटरवर

दहीहंडी उत्सवात मुलगी पळवून आणण्यास मदत करण्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजप अामदार राम कदम यांनी अखेर गुरुवारी ट्विटरवरू

Divya Marathi Sep 07, 2018, 06:38 IST

मुंबई- दहीहंडी उत्सवात मुलगी पळवून आणण्यास मदत करण्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजप अामदार राम कदम यांनी अखेर गुरुवारी ट्विटरवरून महिलांची माफी मागितली. पहिल्या दिवशी खेद व्यक्त करणाऱ्या कदम यांच्याविरुद्ध राज्यभर संताप पसरल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी दिलगिरीच व्यक्त केली हाेती. मात्र तिसऱ्या दिवशी त्यांनी 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मने दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागतो,' असा संदेश टि्वट केला. 


दरम्यान, भाजपने कदम यांचे प्रवक्तेपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेसह विरोधी पक्ष कदम यांच्या निलंबनाचा अशासकीय प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांकडे १५५ मते असून शिवसेनेचे ६३ अामदार सहभागी झाले तर प्रस्ताव मंजूर हाेऊ शकताे. 


कदमांची जीभ छाटून आणणाऱ्यास ५ लाख : सावजी 
बुलडाणा: बेताल बोलणारे अा. राम कदमांचा निषेध करताना माजी मंत्री सुबाेध सावजींनीही पातळी सोडली. 'राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्यास ५ लाख बक्षीस देऊ,' असे अावाहन त्यांनी साेशल मीडियावर व्हिडिअाेद्वारे केल्याचे समाेर अाले आहे. 


Loading...

Recommended


Loading...