Loading...

'स्त्री' बनून घाबरवणाऱ्या श्रद्धाबरोबच भेटा बॉलिवूडमधल्या खलनायकांच्या लेकींना, जाणून घ्या त्यांच्याविषयी

३ सप्टेंबर १९५८ मध्ये नवी दिल्लीत जन्मलेले शक्ती कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये ७०० हून अधिक फिल्म्समध्ये काम केले आहे.

Divya Marathi Sep 03, 2018, 12:31 IST

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये क्राइम मास्टर गोगो (अंदाज अपना अपना) या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी वयाची ५९ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ सप्टेंबर १९५८ मध्ये नवी दिल्लीत जन्मलेले शक्ती कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये ७०० हून अधिक फिल्म्समध्ये काम केले असून त्यांनी वठवलेल्या जास्तीत जास्त भूमिका या खलनायकाच्या आहेत.


रिअल लाइफमध्ये शक्ती कपूर यांचे लग्न अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहिणीसोबत झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सिद्धांत हे मुलाचे तर श्रद्धा कपूर हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. दोन्ही मुले सिनेसृष्टीतच करिअर बनवत आहेत.


बॉलिवूडची A लिस्टर अॅक्ट्रेस 
शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. २०१० मध्ये 'तीन पत्ती' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र लीड रोलमध्ये पहिल्यांदा ती 'लव का दी एंड' या सिनेमात झळकली होती. खरी ओळख तिला तीन वर्षांनंतर मिळाली. श्रद्धाची प्रमुख भूमिका असलेला 'आशिकी २' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. श्रद्धाने 'हैदर', 'एक व्हिलन', 'एबीसीडी २' आणि 'बागी', 'रॉक ऑन २', 'ओके जानू' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' असे चित्रपट केले आहेत. नुकताच तिचा स्त्री चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. 


पुढील स्लाईड्समध्ये भेटा, बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांच्या मुलींना आणि बघा त्यांचे फोटोज...

रंजीतने आतंक, जमींदार, मेरी जुबान, जिगर, हम से है जमाना आणि तिसरी आँख यांसह अनेक गाजलेल्या फिल्म्समध्ये काम केले आहे. अनेक सिनेमांमध्ये त्यांच्या पात्राचे नावसुद्धा रंजीत आहे. त्यांची मुलगी दिव्यांका बेदी एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे.
 

'धर्म और कानून', 'आंधी तूफान', 'भगवान दादा', 'अग्निपथ', हम', 'घातक', 'क्रांतिवीर' आणि 'पुकार' या सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकरणारे डॅनी यांची मुलगी पेमा लाइमलाइटपासून नेहमीच दूर असते. 
 

कुलभूषण खरबंदा यांनी अनेक फिल्म्समध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र शानमधील शाकालच्या रुपात त्यांना लोक ओळखतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की त्यांची मुलगी श्रुतीकडून त्यांना प्रेरणा मिळत असते. त्यांची मुलगी ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव असते. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतचे फोटोज ती नेहमी शेअर करत असते.
 

किरण कुमार यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र आजही लोक त्यांना तेजाब या सिनेमातील लोटिया पठान या भूमिकेसाठी ओळखले जाते. किरण यांची मुलगी सृष्टी सिनेमांपासून दूर आहे. ती मुंबईत एक ज्वेलरी स्टोअर चालवते.
 

मोहरा आणि सरफरोश या सिनेमांमध्ये निगेटिव्ह रोल साकारणारे नसीरुद्दीन शाह दोन मुले आणि एका मुलीचे वडील आहेत. त्यांची मुलगी हिबा शाह थिएटर आर्टिस्ट आहे. सिनेमांपासून ती दूर राहते. एका मुलाखतीत हिबा म्हणाली होती, की पैशांसाठी ती कधीही थिएटर सोडणार नाही.
 

'बॉबी' या सिनेमात प्रेम चोप्रा याच नावाची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांनी अनेक फिल्म्समध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांना तीन मुली आहेत. रकिता, पुनीता आणि प्रेरणा. थोरली मुलगी रकिताने स्क्रिप्ट रायटर आणि पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदासोबत लग्न केले आहे. तर मधली मुलगी पुनीताचे लग्न गायक आणि टीव्ही अभिनेता विकास भल्लासोबत झाले आहे. धाकटी मुलगी प्रेरणाच्या नव-याचे नाव शर्मन जोशी आहे.

 


Loading...

Recommended


Loading...