Loading...

सुखी वैवाहिक जीवनसाथी पती-पत्नीने बेडरूममध्ये करू नये हे काम

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोकांच्या वैवाहिक जीवनातील शांतता नष्ट झाली असून काळासोबत पती-पत्नीमधील प्रेमही कम

Divya Marathi Aug 28, 2018, 00:05 IST

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांश लोकांच्या वैवाहिक जीवनातील शांतता नष्ट झाली असून काळासोबत पती-पत्नीमधील प्रेमही कमी होत आहे. येथे जाणून घ्या, काही अशा गोष्टी ज्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि शांती कायम राहील...


बेडरूममध्ये करू नका एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची चर्चा
पती-पत्नीने बेडरूममध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, एकांतामध्ये फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वतःविषयी चर्चा केल्यास वादाची स्थिती निर्माण होत नाही आणि जवळीकता, प्रेम वाढते.


जुन्या चुकांवर चर्चा करू नका
आपल्या जोडीदाराकडून भूतकाळात एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीची वारंवार जाणीव करून देऊ नका. जे होऊन गेले आहे, त्या वाईट गोष्टीचा पुन्हा विचार केल्यास किंवा त्यावर चर्चा केल्यामुळे वाद आणि दुःखच पदरी पडते. यामुळे जुन्या चुकांवर जास्त चर्चा करत न बसता, भविष्याची योग्य मांडणी करावी.


पती-पत्नी, दोघांनीही एकाच वेळी क्रोध करू नये
सुखी वैवाहिक जीवनासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपला जोडीदार रागात असेल तर त्यावेळी दुसऱ्याने शांत राहणे आवश्यक आहे. जर पती-पत्नी दोघेही एकाच वेळी राग व्यक्त करत असेतील तर परिस्थिती बिघडत जाते. रागामध्ये मनुष्याची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टीची निवड करू शकत नाही. यामुळे सर्वात पहिले रागात आलेल्या जोडीदाराला शांत करण्याचा प्रयत्न करावा.


प्रेमाने मांडा आपला तर्क
वैवाहिक जीवनात अनेकवेळा तर्क-वितर्काची स्थिती निर्माण होते. पती-पत्नी एखाद्या विषयावर वेगवेगळा तर्क मांडतात आणि वाद निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावीत ती म्हणजे, आपली बाजू मांडा परंतु प्रेमाने. आपला तर्क प्रस्तुत करताना आपली भाषा, हावभाव, क्रोध यामध्ये अहंकार असू नये. शांततेत आणि प्रेमाने आपली गोष्ट जोडीदारासमोर ठेवल्यास वादाची स्थितीच निर्माण होणार नाही


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पती-पत्नीमधील प्रेम वाढवणाऱ्या काही खास गोष्टी...


Loading...

Recommended


Loading...