Loading...

B'day: पत्नीसोबत या आलिशान घरात राहतो मराठमोळा राकेश बापट, बघा त्याच्या आशियानाचे INSIDE PICS

मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या राकेश बापटचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत.

Divya Marathi Sep 01, 2018, 00:27 IST

अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता राकेश बापटचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 सप्टेंबर 1978 रोजी मराठी कुटुंबात राकेशचा जन्म झाला. हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर राकेशने गेल्यावर्षी वृंदावन या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. विशेष म्हणजे काल 31 ऑगस्ट रोजी राकेशची महत्त्वाची भूमिका असलेला सविता दामोदर परांजपे हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जॉन अब्राहम या चित्रपटाचा निर्माता तर स्वप्ना जोशी वाघमारे या दिग्दर्शिका आहेत.

 

2001 साली आलेला 'तूम बिन' हा राकेशचा पहिला चित्रपट आहे. त्यानंतर तो अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकला. 'मर्यादा', 'सात फेरे', 'होंगे जुदा ना हम' या त्याच्या गाजलेल्या हिंदी मालिका आहेत. राकेशचे लग्न 2011 साली टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत झाले आहे.  

 

मुंबईत आहे राकेश-रिद्धीचा आशियाना...
मुंबईतील अंधेरीत राकेश आणि रिद्धीचे स्वतःचे घर आहे. 2012 साली त्यांनी मुंबईत स्वतःचे घर साकारले. त्यापूर्वी दोघे जुहू येथे वास्तव्याला होते. जुहू येथील त्यांचे घर लहान होते. पण अंधेरीत त्यांनी मोठे घर घेतले. विशेष म्हणजे या घराचे इंटेरिअर राकेश आणि रिद्धीने स्वतः डिझाइन केले आहे. राकेश स्वतः उत्कृष्ट चित्रकार आहे. त्यामुळे घराला त्याने आर्टिस्टिक रुप दिले आहे. रिद्धीला वाचनाची विशेष आवड आहे, त्यामुळे घरातील ड्राइंग एरियात त्यांनी अतिशय आकर्षक अशी बुक शेल्फ तयार केले आहे. शिवाय घराच्या फ्रेंच डोअरला त्यांनी साड्यांचे पडदे केले आहेत. एका भिंतीला त्यांनी मेमरी वॉलचे स्वरुप देत फॅमिली, फ्रेंड्स आणि त्यांच्या लग्नाचे फोटो कोलाज करुन लावले आहेत. तर एका भिंतीवर गायत्री मंत्र लिहिला आहे. राकेशने तयार केलेल्या पेटिंग्ससुद्धा त्यांनी घरात लावल्या आहेत. अतिशय सुंदररित्या दोघांनी आपले घर सजवले आहे. शूटिंगवरुन दमून घरी आल्यानंतर येथील पॉझिटिव्ह एनर्जी सगळा थकवा दूर करते, असे राकेश सांगतो.

 

पाहुयात, राकेश आणि रिद्धी यांच्या सुंदर घराची खास झलक छायाचित्रांमध्ये...


Loading...

Recommended


Loading...