Loading...

मराठा आरक्षण: कोल्‍हापूरात CM यांच्‍या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीच्या पाण्याने अभिषेक

मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी कोल्‍हापूरात सकल मराठा समाजातर्फे हे आंदोलन करण्‍यात आले.

Divya Marathi Aug 06, 2018, 19:01 IST

कोल्हापूर -  मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत आज सकल मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांनी भर दसरा चौकात  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीच्‍या पाण्‍याने अभिषेक घालून त्‍यांचा जाहीर निषेध केला.  यावेळी मराठा आरक्षणाच्‍या मुद्द्यावर मुख्‍यमंत्री सातत्‍याने वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे, अशा भावना व्‍यक्‍त करत आंदोलकांनी मुख्‍यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्‍या.  एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी यावेळी अवघा दसरा चौक दुमदुमून गेला होता.

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात तब्बल 15 दिवसापासून शांततेत ठिय्या आंदोलन सुरू आहे. संपुर्ण जिल्ह्यातून या आंदोलनाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. आज सकाळी कोल्हापूर शहरातील ड्रेनेज (गटारीतून) मधून वाहणारे घाणेरडे पाणी आणून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला अभिषेक घातला. यावेळी जोरदार घोषणाबाजी व शंखध्‍वनीही करण्‍यात आला.  आंदोलनात मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Loading...

Recommended


Loading...