Loading...

पुरुषांनी कानाडोळा करू नये या सामान्य आजारांकडे, मोठ्या रोगांचे संकेत असू शकतात

पुरुष आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांना गांभीर्याने घेत नाही. अनेकदा सामान्य वाटणारे आरोग्याचे संकेत मोठ्या रोगांचे संके

Divya Marathi Sep 03, 2018, 00:01 IST

पुरुष आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांना गांभीर्याने घेत नाही. अनेकदा सामान्य वाटणारे आरोग्याचे संकेत मोठ्या रोगांचे संकेत असतात. पुरुषांनी कोणत्या संकेतांकडे गांभीर्याने पहावे, याबाबत आज आम्ही माहिती देत आहोत... 


1. घोरणे 
यामुळे स्लीप एप्निया, हृदयविकार, नैराश्य, उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात. 


2. ताण 
कामासंबंधित ताण वाढून नैराश्य वाढते आणि त्यातून हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. 


3. यूरिनच्या तक्रारी 
लघवीला जळजळ, ती वारंवार येण्याची समस्याे, त्रास होणे हे मधुमेह, किडनी किंवा लिव्हरच्या आजारांचा संकेत असू शकते. 


4. तोंडाची दुर्गंधी 
तोंडाची स्वच्छता न ठेवण्यासोबतच हे मधुमेह, यकृत किंवा किडनी खराब असण्याचा संकेत असू शकते. 


5. पाठदुखी 
सतत पाठदुखी होणे हे मूतखड्याचे कारण असू शकते. 


6. कमजोरी, थकवा 
यामागे आयरनची कमतरता, हृदयविकार, थायरॉइड प्रॉब्लेम सारखी कारणे असू शकतात. 


7. डोकेदुखी 
शरीरात पाण्याच्या कमतरते व्यतिरिक्त हृदय आणि मेंदूसंबंधी आजार असू शकतो. 

 
8. खांद्याच्या वेदना 
कमजोरी, थकवा, श्वास घेण्यात अडचण यासोबतच हृदयविकाराचा संकेत असू शकतो. 


9. खाज 
त्वचारोगाबराेबरच लिव्हर डिसिज, किडनीचा आजार किंवा डायबिटीजचे कारण असू शकते. 


10. जुलाब 
लूज मोशन, मोशनमध्ये बदल, बद्धकोष्ठता, पोट फुगण्याची समस्या हे कँसरसारख्या आजाराचे कारण असू शकते.


Loading...

Recommended


Loading...