Loading...

खानीमध्ये काम करणा-या व्यक्तीला मिळाला विचित्र दगड, 90 किलो होते वजन, किंमत ऐकून व्हाल अवाक्

ऑस्ट्रेलियामध्ये खोदकाम करताना एका व्यक्तीला इतिहासातील सर्वात जड सोन्याचा दगड सापडला.

Divya Marathi Sep 12, 2018, 12:00 IST

ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये खोदकाम करताना एका व्यक्तीला इतिहासातील सर्वात जड सोन्याचा दगड सापडला. हा व्यक्ती माइनिंग करणा-या आपल्या मित्रांसोबत हा 90kgचा दगड सोबत घेऊन आला. नंतर या दगडाची खरी किंमत कळाली तेव्हा सर्वच चकीत झाले.
- 90kg चा सोन्याचा दगड ऑस्ट्रेलियाच्या एका खानीत सापडला. ही खान 45 वर्षे जुनी आहे. तपासात उघड झाले की, एवढा मोठा सिंगल सोन्याचा दगड इतिहासात पहिले कधीच मिळालेला नाही. 


यापुर्वीही असा दगड सापडला, परंतू तो एवढा वजनी नाही 
यापुर्वीही असा दगड सापडला होता. परंतू त्याचे वजन 60kg होते. या 90kgच्या दगडातून 65 ते 70kg सोने काढता येऊ शकेल.


एवढी आहे किंमत 
- आतंरराष्ट्रीय स्तरावर या दगडाची किंमत 2 मिलियन डॉलर सांगितली जात आहे. या शोधाचे श्रेय एयरलेग ड्रिलर हॅनरी डोलला दिले जात आहे. 


तिथून सोन्याचे सालं निघत होते 
16 वर्षांपासून माइनिंगचे काम करत असणा-या हॅनरी यांनी सांगितले की, यापुर्वी ऐवढा मोठा सोन्याचा दगड कधीच पाहिलेला नाही. मी ड्रिलिंग करत होतो तेव्हाच त्या छिद्रामधून सोन्याचे साल निघून लागले. मला लगेच कळाले की, आत काही सोने आहे. परंतू जेवढे सोने निघाले, त्याची कल्पनाही केली नव्हती

 

 

 

 

 


Loading...

Recommended


Loading...