Loading...

3000 पाकड्यांना रात्रभर झुंजवले भारताच्या 120 वाघांनी, मेजर कुलदीप ठरले होते युद्धाचे हिरो

मेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांना 1971 च्या युद्धाचे हिरो समजले जाते.

Divya Marathi Aug 11, 2018, 00:06 IST

चंदिगड - 15 ऑगस्ट 2018 भारताचा 72वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. 'रियल हिरो सिरीज' मध्ये आम्ही अशा वीरगाथा सांगणार आहोत, ज्यांनी संकटकाळामध्ये देशासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. आम्ही आज तुमच्यासाठी 1971 च्या युद्धातील एका वीर योद्ध्याबाबत सांगणार आहोत. 1971 चे भारत-पाक युद्ध 3 ते 12 डिसेंबरदरम्यान चालले होते. या युद्धाचे साक्षीदार ठरले होते मेजर कुलदीप सिंह चांदपुरी. 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओलने ब्रिगेडियर चांदपुरी यांचेच पात्र साकारले होते. 


युद्धाचे हिरो ठरले चांदपुरी...
- ब्रिगेडियर चांदपुरी सध्या चिंदिगडमध्ये आहेत. आता ते मेजरचे ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी बनले आहेत. सध्या लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते आता कुटुंबाबरोबर राहत आहेत. 
- लाँगेवालाच्या लढाईत ब्रिगेडियर चांदपुरी यांना हिरो समजले जाते. लाँगेवाला पोस्‍ट आपल्या लष्करासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होते. त्याची जबाबदारी मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांना सोपवण्यात आली होती. 


3000 पाक सैनिकांसमोर चांदपुरे यांचे फक्त 120 जवान
-1971 च्या लढाईवेळी मेजर चांदपुरी यांना पंजाब रेजिमेंटच्या 23व्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यापूर्वी ते 1965 च्या लढाईतही पाकिस्तानी लष्कराला त्यांनी धूळ चारली होती. मेजर चांदपुरी यांच्याकडे फक्त 120 जणांची तुकडी होती. तर समोर पाकच्या 51व्या इन्फंट्री ब्रिगेडचे 2,000 ते 3,000 जवान होते. तसेच 22व्या आर्म्ड रेजिमेंटचीही मदत त्यांना मिळत होती. 
- 5 डिसेंबर 1971 ला अगदी पहाटे पाकिस्तानने भारतीय लष्करावर हल्ला चढवला. रात्रभर त्यांनी 120 जणांच्या तुकडीसह सत्रूचा सामना केला. चांदपुरी सैनिकांना शत्रूबरोबर लढण्यासाठी मदत मिळेपर्यंत प्रोत्साहन देत राहिले.  
- एका बंकरहून दुसऱ्या बंकरपर्यंत जाऊन ते सैनिकांना प्रोत्साहीत करत होते. आपले सैनिक आज सर्वात शूर आहेत. पण त्याकाळी एअरफोर्सकडे जे एअरक्राफ्ट होते ते रात्री लढाई करण्यात अपयशी ठरत होते. सकाळपर्यंत मेजर चांदपुरी आणि त्यांची तुकडी शत्रूबरोबर लढत राहिले. सकाळी जेव्हा एअरफोर्स पोहोचले तेव्हा त्यांना मदत मिळाली. युद्धानंतर मेजर चांदपुरी यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. 

 

 


Loading...

Recommended


Loading...