Loading...

कुबेरदेवाशी संबंधित या वस्तू घर-दुकानात ठेवण्यात होऊ शकता मालामाल

घर-दुकानातील उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानले जाते. ही दिशा सुख-सुविधा आणि धनलाभ करून देणारी मानली जाते.

Divya Marathi Aug 04, 2018, 17:01 IST

घर-दुकानातील उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानले जाते. ही दिशा सुख-सुविधा आणि धनलाभ करून देणारी मानली जाते. या दिशेला वास्तुनुसार काही खास वस्तू ठेवल्यास भगवान कुबेर तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कुबेरदेवाशी संबंधित 5 खास वस्तू....


1. घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला हिरवा रंगाचा पिरॅमिड ठेवणे शुभ ठरते. यामुळे तेथील सर्व वास्तुदोष नष्ट होऊ लागतात.


2. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवून हे घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला स्थापित करा. असे केल्याने शुभफळ प्राप्त होतात.


3. घर-दुकानातील उत्तर दिशेला तीन नाणे लाल कपड्यात बांधून अशाप्रकारे ठेवा की, त्यावर कोणाचीही दृष्टी पडणार नाही.


4. घर-दुकानाच्या उत्तर दिशेला नारळ ठेवणे शुभ ठरते. रोज सकाळी शिळे नारळ नदी किंवा विहिरीत प्रवाहित करावे. नवीन नारळावर हळद-कुंकू लावून त्याच ठिकाणी स्थापित करावे.


5. घर-दुकानाच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने धनहानी होणार नाही. यासोबतच धनलाभाचे योग जुळून येतील.


Loading...

Recommended


Loading...