Loading...

अक्षय कुमारने या 5 जवळच्या मित्रांसोबत केली धमाकेदार पार्टी, फोटो शेअर करत बॉबीने दिल्या शुभेच्छा

अक्षय कुमार हा रविवारी आपला 51 वा वाढदिवस साजरा करतोय. अक्षयने आपला हा वाढदिवस मित्रांसोबत शनिवारी रात्रीच सेलिब्रेट केल

Divya Marathi Sep 09, 2018, 15:11 IST

मुंबई: अक्षय कुमार हा रविवारी आपला 51 वा वाढदिवस साजरा करतोय. अक्षयने आपला हा वाढदिवस मित्रांसोबत शनिवारी रात्रीच सेलिब्रेट केला. तो पत्नी ट्विंकल खन्ना आणि 5 जवळचे मित्र बॉबी देओल, तान्या देओल, फराह खान अली, सनी दीवान आणि अनु दीवानसोबत दिसला. यावेळी त्यांचे मुलं आरव आणि नितारा सोबत नव्हते. सेलिब्रेशनचा एक इनसाइड फोटो ट्विंकल खन्नानेही पोस्ट केला आहे. यामध्ये सर्वच पार्टी मूडमध्ये दिसत आहेत. फोटो पाहून स्पष्ट समजते की, अक्षयची बर्थडे पार्टी धमाकेदार झाली आहे. 


ट्विंकलने केली नव्हती पतीच्या बर्थडेची प्लानिंग...
- ट्विंकलने पार्टीचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "जेव्हा आपण काही प्लानिंग करत नाही, तेव्हा गोष्टी आपोआप ठिक होतात. हॅप्पी बर्थडे माय लव्हली मिस्टर K"
- ट्विंकलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला 10 तासात 2 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.
- हाच फोटो बॉबी देओलनेही शेअर केला आणि अक्षयला शुभेच्छा दिल्या. त्याने "Happy happy birthday Akshay Bhaiya।" असे लिहिले.
- अक्षयचे 'पॅडमॅन' आणि 'गोल्ड' हे दोन चित्रपट यावर्षी रिलीज झाले आहेत. दोघांनीही बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता तो लवकरच साउथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत '2.0' मध्ये दिसणार आहे. 

 

 

 


Loading...

Recommended


Loading...