Loading...

KBC 10: हातगाडी चालवून वडिलांनी मुलीला बनवले प्रोफेसर, असा आहे या स्पर्धकाचा संघर्ष

बुधवारच्या एपिसोडमध्ये बिग बींसमोर हॉट सीटवर बसली होती पंजाबच्या अमृतसरची रहिवाशी किरण.

Divya Marathi Sep 06, 2018, 11:41 IST

अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' छोट्या पडद्यावर परतला आहे. गेल्या पर्वाप्रमाणेच सीझनला 10लाही प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळत आहे. काल म्हणजेच बुधवारी या सीझनचा तिसरा एपिसोड टेलिकास्ट झाला. यावेळी जी स्पर्धक हॉट सीटपर्यंत पोहोचली, तिचा संघर्ष ऐकून बिग बीसुद्धा भावूक झाले.


बुधवारच्या एपिसोडमध्ये बिग बींसमोर हॉट सीटवर बसली होती पंजाबच्या अमृतसरची रहिवाशी किरण. ती एक PHD स्टूडंट असून कॉलेजमध्ये सहायक प्रोफेसर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे. याशिवाय ती राष्ट्रीय पातळीवरची जिम्नास्ट आहे. किरणला तिच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे. 

 

किरणचे वडील राम अजोर हे रेडीमेड हँडबँग बनवायचे काम करत होते. पण त्यांची नोकरी गेली. त्यावेळी किरण खूप लहान होती. महिनाभर राम हे बेरोजगार होते. किरणने सांगितले, 'आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आहोत. एक काळ असा होता, जेव्हा आमच्याजवळ एका वेळच्या जेवणासाठी अन्न नसायचे.' हे सगळं सांगताना किरणचे डोळे पाणावले होते. नोकरी मिळत नसल्याने किरणच्या वडिलांनी हातगाडीवर झाडे विकण्याचे काम सुकु केले. ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असो, राम त्यांचे काम एकही दिवस बंद ठेवत नव्हते. अंगात ताप असतानाही वडील हातगाडीवर गल्लीबोळात झाडे, कुंड्या विकायचे काम करायचे, असे किरणने यावेळी सांगितले. 
 

किरणचे वडील राम अजोर यांचे म्हणणे होते,  'मला ठाऊक आहे, की जर मी काम केले नाही, तर माझ्या कुटुंबीयांना अन्नाचा एकही कण मिळणार नाही.' आज राम अजोर यांची चारही मुले शिक्षित असून चांगली नोकरी करत आहेत. किरणला PHD चे शिक्षण पूर्ण करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

 

किरणने केबीसीच्या खेळाला चांगली सुरुवात केली. किरणला सुरुवातीला थोडी अचडण आली. चारही लाइफलाइनचा वापर करुन किरणने 1 लाख 60 हजार रुपये जिंकले. त्यानंतर तिने गेममधून क्वीट केले. किरणच्या वडिलांना अमिताभ बच्चन म्हणाले, 'तुम्हाला मी प्रणाम करते. देशासाठी तुम्ही एक उदाहरण आहात. तुमची मुलगी किरण एख जिम्नास्ट आहे, ही देशासाठी एक मोठी गर्वाची गोष्ट आहे.' अमिताभ यांचे हे बोलणे ऐकून किरणचे वडील खूप भावूक झाले होते.

 


Loading...

Recommended


Loading...