Loading...

करीना आता करत आहे दुस-या बाळाचे प्लानिंग, टीव्ही शोमध्ये सांगितले, कधी होणार तैमूर मोठा दादा?

करीना आता दुस-या बाळाच्या विचारात असल्याची बातमी आली आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 13:12 IST

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान अलीकडेच मालदीवमध्ये फॅमिली हॉलिडे एन्जॉय करुन परतले आहेत.  करीना आता दुस-या बाळाच्या विचारात असल्याची बातमी आली आहे. करीना अलीकडेच तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत ट्रेड एनालिस्ट कोमल नहाटा यांच्या "Starry Nights 2.Oh!" या शोमध्ये सहभागी झाली होती. या चॅट शोमध्ये करीनाने स्वतः खुलासा केला की, ती आणि सैफ आता दुस-या बाळाचे प्लानिंग करत आहेत. 

 

करीनाच्या प्रेग्नेंसीवर बेस्ट फ्रेंड अमृताचे हे होते उत्तर... 

- 21 महिन्यांचा तैमूर इंडस्ट्रीतील मीडिया फ्रेंडली स्टारकिड्सपैकी एक आहे. या चॅट शोमध्ये करीनाने खुलासा केला की, ती दोन वर्षांनंतर दुस-या बाळाचे प्लानिंग करणार आहे.

- करीनाचे हे उत्तर ऐकून अमृता अरोरा गमतीने म्हणाली, "मी करीनाला सांगून ठेवले आहे की, जेव्हा ती दुस-यांदा प्रेग्नेंट होईल तेव्हा मला आधी सांग, कारण मी हा देश सोडून निघून जाईल"

- झाले असे की, पहिल्या प्रेग्नेंसीच्या काळात करीनाने तिचा सर्वाधिक काळ अमृता अरोरासोबत घालवला होता. त्याकाळात करीना तिच्या फॅशनेबल लूकसाठीही ट्रेंडमध्ये होती.

- करीनाने आपल्या प्रेग्नेंसीच्या काळात काम सुरु ठेवले होते. ती सर्व महिलांसाठी ट्रेंड सेटर बनली होती. तिने फॅशन शोमध्ये बेबी बंपसोबत रॅम्प वॉक केला होता. इतकेच नाही तर बाळाच्या जन्मानंतर ती लवकरच वजन कमी करुन तिच्या पुर्वीच्या रुपात परतली होती.

- करीनाने 20 डिसेंबर 2016 रोजी तैमूरला जन्म दिला.

 

शाहिदसोबत ब्रेकअपनंतर सैफच्या जवळ आली होती करीना...

- पहिले अफेअर, मग लिव्ह इन आणि पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर करीना-सैफ 2012 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. एकीकडे करीना बॉलिवूडच्या प्रभावशाली कपूर घराण्यातून आहे, तर सैफ रॉयल फॅमिलीचे नवाब मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे.
- 2007 मध्ये शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीनाचे सैफ अली खानसोबत सूत जुळले होते. 'ओमकारा' या चित्रपटात दोघांचे एकत्र कमी सीन असूनदेखील हे दोघे बराच वेळ एकत्र सेटवर वेळ घालवत होते.
- 'ओमकारा'नंतर यशराज बॅनरच्या 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर दोघांमधील जवळीक वाढली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या सुरु झाल्या होत्या. 

 

लव्ह जिहादवर करीना म्हणाली होती...
- लॅक्मे फॅशन वीकवेळी करीना आणि सैफ पहिल्यांदा एकत्र एका गाडीतून आले होते. येथेच सैफने पहिल्यांदा करीनाला डेट करत असल्याचे कबूल केले होते. 2010 मध्ये हे कपल लग्न करत असल्याचे वृत्त आले होते. पण त्याचे खंडन दोघांनी केले होते. काही संघटनांनी त्यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले होते. त्यावर आपण कोणत्याही विचारधारेवर विश्वास ठेवत नसल्याचे करीनाने म्हटले होते.

- मी फक्त प्रेमावर विश्वास ठेवते. सैफ अली खान हा खुल्या विचारांचा आहे. त्याने लव्ह जिहादबाबत एक पत्रक प्रसिद्ध करुन आपलं मतं व्यक्त केलं होतं. त्या पत्रात त्यांने सांगितलं होतं, की, मी एका हिंदू मुलीशी विवाह केला आहे आणि ती मुलगी म्हणजे मी (करीना कपूर) होते आणि आम्ही कोर्टात लग्न केले होते. 
- पुढे करीना म्हणाली होती, प्रेम ही अशी गोष्ट आहे की, जिला कोणत्याही एका संकल्पनेत बांधू शकत नाही. यामध्ये एक वेड, आकर्षण तसंच अन्य गोष्टी सामावलेल्या असतात. हे दोन व्यक्तींमध्ये होते. जर का एक हिंदू मुलगा असेल आणि मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडला असेल, तर त्यांना रोखता येणार नाही, प्रेम करताना आपण धर्म विचारुन करत नाही, असंही ती म्हणाली होती. 


Loading...

Recommended


Loading...