Loading...

रॅम्पवर अगदी एखाद्या परीसारखी दिसली करीना कपूर, स्टनिंग लूकमध्ये दिसली जॅकलिन

अभिनेत्री करीना कपूर रॅम्पवर अवतरली होती. डिझायनर मोनिशा जयसिंह यांच्या शोची करीना शो स्टॉपर होती.

Divya Marathi Aug 28, 2018, 13:53 IST

मुंबईः गेल्या आठवड्याभरात चालेल्या लॅक्मे फॅशन वीक (LFW 2018) चा रविवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी अभिनेत्री करीना कपूर रॅम्पवर अवतरली होती. डिझायनर मोनिशा जयसिंह यांच्या शोची करीना शो स्टॉपर होती. तिने सिल्व्हर ग्रीन गाऊन परिधान करुन जलवा दाखवला. करीनाचे लॅक्मे ब्रॅण्डसोबत अतिशय जुने नाते आहे. एका मुलाखतीत करीना म्हणाली होती, ''लॅक्मेच्या ग्रॅण्ड फिनालेत सहभागी होणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. या रॅम्पवर चालणे आणि ब्रॅण्डचे प्रमोशन करणे मला आवडते.'' 


मोनिशाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली करीना... 

लॅक्मे फॅशन वीकच्या फायनल राउंडमध्ये रॅम्पवर अवतरलेल्या करीनाने डिझायनर मोनिशा जयसिंह यांनी डिझाइन केलेला होलोग्राफिक ऑफ शोल्डरची निवड केली होती. या ड्रेसमध्ये करीना अतिशय स्टायलिश आणि स्टनिंग दिसली. मुलगा तैमूरच्या जन्मानंतर आता करीना पुन्हा एकदा कामावर परतली आहे. आई होण्यासोबतच ती स्वतःचे प्रोफेशनल लाइफ अतिशय उत्तमरित्या बॅलेन्स करते. करीनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती लवकरच करण जोहरच्या मल्टीस्टारर तख्त या चित्रपटात झळकणार आहे.

 
हेमा मालिनी मुलीसोबत अवतरल्या रॅम्पवर...
लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री हेमा मालिनी त्यांची थोरली कन्या ईशा देओलसोबत रॅम्पवर अवतरल्या होत्या. यावेळी या मायलेकी ट्रेडिशनल लूकमध्ये अतिशय सुंदर दिसल्या. दोघींनीही डिझायनर संजुक्ता दत्ताचे कलेक्शन यावेळी सादर केले. हेमा यांनी यलो-ब्लू आणि रेड कलरची सिल्क साडी परिधान केली होती. तर त्यांची लेक ईशा यावेळी व्हाइट पिंक कलरच्या सिल्क लहेंग्यात दिसली. यांच्याशिवाय बिपाशा बसु, कंगना रनोट, दीया मिर्झा, मलाइका अरोरा, शाहिद कपूर, सोनू सूद, डायना पेंटी, कल्कि कोचलिन, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, आदिति राव हैदरी, करण जोहर, अंगद, नेहा धूपिया, राधिका आपटेसह जान्हवी कपूरनेही रॅम्पवर आपली जादू दाखवली. 

 


Loading...

Recommended


Loading...